आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nissan Datsun Go News In Marathi, Automobiles, Small Car

उद्या लॉंच होणार ही 3 लाखांची किफायती कार, 20 किलोमीटरचा मायलेज देणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निसान ही ऑटोमोबाईल कंपनी उद्या (बुधवार) ‘डटसन गो’ नावाची किफायती कार लॉंच करणार आहे. मारुती सुझुकीच्या सर्वांधिक विकल्या जाणाऱ्या ऑल्टो कारसमोर ‘डटसन गो’मुळे एक आव्हान उभे ठाकणार आहे. या कारची किंमत सुमारे 3 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
ऑल्टो आणि सेलेरियो या सारख्या गाड्यांना ही कार जबरदस्त टक्कर देणार आहे. होंडाच्या ईऑन कारच्या विक्रीवरही या कारमध्ये प्रभाव पडण्याची शक्यता आहे. ‘डटसन गो’मध्ये 1200 सीसीचे पेट्रोल इंजिन लावण्यात आले आहे. निसान मायक्राप्रमाणे हे इंजिन तयार करण्यात आले आहे.
ही कार एक लिटर पेट्रोलमध्ये 20 किलोमीटरचा मायलेज देईल. पहिल्यांदा कार विकत घेणाऱ्या ग्राहकांना समोर ठेऊन ही कार लॉंच केली जाणार आहे. या कारला मोबाईल कनेक्ट करून हवी ती गाणी ऐकण्याची सुविधा आहे. ऑटो एक्स्पो 2014 मध्ये ही कार सादर करण्यात आली होती.
‘डटसन गो’ या कारचे फिचर्स जाणून घ्या पुढील स्लाईडवर