आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॅटसन गो प्लस निस्सानची नवी कॉम्पॅक्ट फॅमिली वॅगन बाजारात दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - माेटारनिर्मिती क्षेत्रातील अग्रणी निस्सान मोटारने चार मीटरखालील प्रकारातील पहिली कॉम्पॅक्ट एमपीव्ही बाजारात दाखल केली आहे. डॅटसन गो हे डॅटसनचे भारतातील दुसरे उत्पादन असून लवचिक आसनव्यवस्था आणि सामानासाठी अतिरिक्त जागा हे या नव्या मोटारीचे वेगळे वैशिष्ट्य आहे.

या अगोदरच्या महिन्यात निस्सानने डॅटसन गो प्लससाठी आगाऊ आरक्षण करण्याची घोषणा केली होती. जपानमधील निस्सान मोटार्सने ‘डॅटसन’ ब्रँड पुन्हा रिलाँच केला असून निस्सान, इन्फिनिटीनंतरचा तिसरा ब्रँड आहे. गेल्या वर्षात कंपनीने डॅटसनच्या विक्रीला भारत, इंडोनेशिया, रशिया आणि दक्षिण आफ्रिकेतून सुरुवात केली.

डॅटसन गोमुळे देशात ४ मीटरखालील कॉम्पॅक्ट कौटुंबिक वॅगनचे एक नवे पर्व सुरू झाले असल्याचे डॅटसनचे जागतिक प्रमुख व्हिन्सेंट कोबी यांनी अनावरणप्रसंगी बोलताना सांगितले.

गरजानुसार डिझाइन
भारतीयांच्या नेमक्या गरजा ओळखूनच या छोटेखानी कौटुंबिक मोटारीची निर्मिती करण्यात आली असल्याचे निस्सान इंडियाचे अध्यक्ष गिलौमे सिकार्ड यांनी सांगितले.

फीचर्स
*‘स्क्वेअर्ड ऑफ इस्टेट’ शैलीमुळे आसनांची तिसरी रांग बसवणे शक्य
*तिसरी रांग दुमडली असता ३४७ लिटर एवढी सामानाची जागा
*थकवा कमी करणारी व मणक्याला आधार देणारी पुढील आसने
*डिजिटल कॉम्प्युटर असलेले स्मार्ट मीटर
*‘फॉलो मी होम’ हेडलॅम्प, वेग संवेदनाक्षम व टिअरड्रॉप कार्य असणारे वायपर
*मोबाइल डॉकिंग स्टेशन (एमडीएस) केबिनच्या सोयीत भर घालते,
*१.२ लिटरचे उच्च कार्यक्षमता देणारे तीन सिलिंडरचे इंजिन
*दोन वर्षे/ अमर्याद किलोमीटरची वॉरंटी
*पाच रंगांत उपलब्ध : लाल, सोनेरी, पांढरा, चंदेरी व कांस्य
*किंमत : डॅटसन गो डी : ३.७९ लाख रु., गो डी १ : ३.८२ लाख रु., गो ए : ४.१५ लाख रु., गो टी : ४.६१ लाख रु.