आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nissan Rolls Out New Sunny Priced From Rs 7.29 10.22 Lakh

निस्सानची सनी नव्या रूपात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - निस्सान मोटर इंडिया कंपनीने आपली ‘निस्सान सनी’ ही मोटार नव्या रूपात पुन्हा बाजारात सादर केली आहे. काही नव्या वैशिष्ट्यांचा समावेश केलेली ही मध्यम आकाराची सेडान आता पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही प्रकारात उपलब्ध होणार आहे.

दहाव्या पिढीतील लोकप्रिय मॉडेलच्या धर्तीवर बाजारात आलेली नवी सनी ही या अगोदर 2011 मध्ये पहिल्यांदा बाजारात आली. यंदाच्या जूनमध्ये निसानच्या विक्रीमध्ये 48 टक्क्यांनी वाढली. निसानच्या दृष्टीने भारत ही एक मुख्य बाजारपेठ आहे.
काय आहे नव्या सनीमध्ये ?
- ब्ल्यूटूथ सक्षम ध्वनियंत्रणा
- पियानो ब्लॅक फिनिश सेंटर कन्सोलसह डॅशबोर्डमध्ये सुधारणा
- नवीन स्टिअरिंग व्हील
- सुरक्षिततेसाठी आणखी नवीन सुविधा
- पेट्रोलचे तीन, तर डिझेलचे पाच प्रकार
- रंगसंगती : पर्ल व्हाइट, डीप ग्रे, नाइट शेड, ओनिक्स ब्लॅक, ब्राँझ ग्रे, ब्लेड सिल्व्हर
- किंमत : पेट्रोल आणि डिझेल : 7.29 लाख आणि 10.22 लाख रुपयांदरम्यान (एक्स शोरूम, मुंबई)

(फोटो - निस्सान मोटर इंडिया कंपनीने आपली ‘निस्सान सनी’ ही मोटार नव्या रूपात मुंबईत सादर केली. त्या वेळी कंपनीचे मुख्य नियोजन अधिकारी अँडी पाल्मर)