आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘टेरानो’ 20 ऑगस्ट रोजी मुंबईत;निस्सान एसयूव्हीची प्रतीक्षा संपली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- रेनॉल्टच्या ‘डस्टर’ने एसयूव्ही प्रेमींचे लक्ष वेधल्यानंतर आता निस्सानच्या प्रतीक्षा लागून राहिलेल्या‘ टेरानो’ एसयूव्हीचे आगमन होत आहे. ‘डस्टर’च्याच धर्तीवर तयार करण्यात आलेली या छोट्या एसयूव्हीचे 20 ऑगस्टला मुंबईत अनावरण होत असल्याचे कंपनीने अधिकृतरीत्या म्हटले आहे. निस्सानची टेरानो ‘एक्सएल, एक्सएल (ओ), एक्सव्ही आणि एक्सव्ही प्रीमियम या चार प्रकारच्या श्रेणीत उपलब्ध होणार आहे. ‘डस्टर’च्या तुलनेत ही नवी एसयूव्ही थोडीशी महाग असल्याचा अंदाज वाहन बाजारपेठेतील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. टेरानो एसयूव्हीमध्ये पेट्रोल आणि डिझेल असे दोन्ही इंजिनांचे पर्याय उपलब्ध असतील.