आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीता अंबानींचा बर्थ-डे 220 कोटींचा, लंडनहून पाळणा तर थायलंडवरून मागवली फुले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर- पत्‍नीचा 50च्‍या बर्थ-डे सेलिब्रेशन संस्‍मरणीय करण्‍यासाठी उद्योगपती मुकेश अंबानी यांनी जगभरातील सर्वोत्‍कृष्‍ट साधनांचा वापर केला. दोन दिवस चाललेल्‍या या अतिभव्‍य सोहळयासाठी देश-विदेशातून एक्‍सपर्ट बोलावण्‍यात आले होते. सेलिब्रेशनच्‍या पहिल्‍या रात्री उमेद पॅलेसचे स्‍वरूप व्हिडिओ मॅपिंगच्‍या साहाय्याने पूर्णपणे बदलण्‍यात आले होते. यासाठी खास सिंगापूरवरून टीम बोलावण्‍यात आली होती.

अशा त-हेच्‍या लाईट इफेक्‍ट्सचा राजस्‍थानमध्‍ये पहिल्‍यांदाच वापर करण्‍यात आला. या लाईट्सच्‍या माध्‍यमातून धीरूभाई अंबानी यांचा चेहरा बनवण्‍यात आला होता. प्रोजेक्‍शन मॅपिंगलाच व्हिडिओ मॅपिंग म्‍हटले जाते. खास प्रोजेक्‍टरद्वारे आपल्‍याला पाहिजे तो फोटो, संदेश किंवा व्हिडिओला 2डी किंवा 3डी स्‍वरूपात सरफेसवर जिवंत केले जाते.

या तंत्राचा बहुतकरून वापर हा जाहिरातीत केला जातो. अनेक हिंदी चित्रपटांत या तंत्राचा वापर करण्‍यात आलेला आहे. या क्षेत्रातील माहितगारांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार या बर्थ-डे सेलिब्रेशनवर सुमारे 220 कोटी रूपये खर्च करण्‍यात आले आहे. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या आणखी काय-काय खास होते नीता अंबानी यांच्‍या बर्थ-डे पार्टीमध्‍ये...