आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा मुकेश यांच्या मुलांचा पॉकेटमनी पाहून मित्र म्हणायचे, अरे तु अंबानी आहे की भिकारी...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातीलच नव्हे तर जगातील श्रीमंत उद्योगपतींमध्ये गणले जाणारे मुकेश अंबानी यांचा आज (19 एप्रिल) 56वा वाढदिवस आहे. यशस्वी उद्योजक असलेले अंबानी व्यक्तिगत आयुष्यातही यशस्वी आहेत. नीता अंबानींसाठी ते सुयोग्य पती तर, मुलांसाठी आदर्श वडील आहेत. मुकेश आणि नीता यांना आकाश, अनंत आणि मुलगी इशा ही तीन मुले आहेत. या तिन्ही मुलांच्या शिक्षण आणि संस्कारावर त्यांनी वैयक्तिक लक्ष ठेवले आहे. भावी आयुष्यात 'चांगला माणुस' म्हणून त्यांची ओळख व्हावी यासाठी दोघेही नेहमी प्रयत्नशील असतात. सर्वसामान्य आयांप्रमाणेच नीताही त्यांच्या मुलांचा सांभाळ करतात हे ऐकून कोणालाही आश्चर्य वाटले.

आकाश, अनंत आणि इशा जेव्हा शाळेत जात असत तेव्हा त्यांचा पॉकेटमनी पाहून त्यांचे मित्र त्यांना खूप चिडवत. एक दिवस मुकेश यांचा लहान मुलगा अनंत याच्या खिशातील पैसे पाहून त्याचा मित्र त्याला म्हणाला अरे, तु अंबानी आहे की, भिकारी...! अनंतने घरी आल्यानंतर आई नीता आणि वडील मुकेश यांना ही हकीगत सांगितली तेव्हा मुलाला काय समजवावे असा प्रश्न या दोघांनाही पडला होता.

जगातील दिग्गज उद्योगपतींपैकी एक असलेले मुकेश अंबानी यांची मुले शाळेत महागड्या कारने जात नव्हती तर, घर ते शाळा हा प्रवास ते पब्लिक ट्रान्सपोर्टने करत होते. गर्भश्रीमंतांच्या मुलांचा सांभाळ असाही होऊ शकतो हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.

divyamarathi.com वर वाचा, गर्भश्रीमंतांच्या मुलांना पॉकेटमनीसाठी कमी पैसे का दिले जातात. का त्यांनी, सर्वसामान्यांच्या मुलांप्रमाणे सार्वजनिक वाहतूकीने प्रवास केला...