आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएफसाठी आधारची सक्ती लांबली ; नवीन खातेदारांना दिलासा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी योजनेत सहभागी होणा-या नवीन सदस्यांना एक मार्चपासून आधार कार्ड सक्तीचे केले होते, परंतु कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी मंडळाने आधार कार्ड बंधनकारक करण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्याचे जाहीर केले आहे.

यूआयडीएआय अधिका-यांबरोबर झालेली चर्चा आणि आधार क्रमांक मिळवण्यासाठी लागणा-या प्रक्रियेचा कालावधी लक्षात घेता कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांना एक मार्चपर्यंत आधार कार्ड मिळणे शक्य होणार नाही. त्यामुळे ईपीएफ सदस्यांना एक मार्च 2013 पर्यंत आधार कार्ड बंधनकारक न करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेने आपल्या कर्मचा-यांना पाठवलेल्या एका आदेशात म्हटले आहे.

नोकरी बदलल्यानंतर नवीन
प्रॉव्हिडंट फंड खात्यात पीएफची रक्कम हस्तांतरित करताना कर्मचा-यांना त्रास होतो. त्यांची ही गैरसोय दूर करण्याच्या दृष्टीने या कर्मचा-यांना आधार कार्ड देण्याचा कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीचा विचार होता.

वेळखाऊ प्रक्रिया
आधार कार्ड तयार करण्याची प्रक्रिया वेळखाऊ असून केवळ 18 राज्यांमध्येच ही योजना आतापर्यंत कार्यान्वित झाली असल्याचे कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीला आढळून आले. सध्या ईपीएफओ डेटा बेसच्या कामात व्यग्र आहे. यामुळे कायम खाते क्रमांकधारी सदस्यांना नोकरी बदलानंतर पीएफचे खाते हस्तांतरित करण्याची गरज भासणार नाही.