आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • No Any Possibility To Increase Fdi In Banking Sector Says Government

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बँकांतील एफडीआयची मर्यादा वाढवणार नाही, सरकारचे स्पष्टीकरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बँकिंग क्षेत्रातील विदेशी थेट गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे वित्त राज्यमंत्री नमो नरीन मीणा यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात माहिती देताना सांगितले.

खासगी क्षेत्रातील बँकांमध्ये विदेशी थेट गुंतवणूक, विदेशी गुंतवणूकदार संस्था आणि अनिवासी भारतीय आदी विविध स्वरूपांतील सरासरी विदेशी गुंतवणूक 74 टक्क्यांच्या मर्यादा ओलांडू शकत नाही. स्टेट बॅँक ऑफ इंडिया आणि तिच्या सहयोगी बँका अशा राष्‍ट्रीयीकृत बॅँकांसाठी ही मर्यादा 20 टक्के आहे. बॅँकिंग क्षेत्रातील विदेशी गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. ही मर्यादा वाढवण्याबात बॅँका किंवा संघटनांकडूनदेखील अलीकडच्या काळात कोणताही प्रस्ताव नसल्याचे मीणा यांनी स्पष्ट केले. विमा क्षेत्रातील गुंतवणूक मर्यादा 49 टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी 2008 मध्ये विमा कायदा सुधारणा विधेयक आणण्यात आले होते.