Home »Business »Industries» No Concession In Budget Say Agriculture

बजेटमध्ये सवलतींवर पाणी सोडावे लागणार : कृषिमंत्री

प्रतिनिधी | Jan 10, 2013, 01:00 AM IST

  • बजेटमध्ये सवलतींवर पाणी सोडावे लागणार : कृषिमंत्री

मुंबई - सध्याच्या नाजूक आर्थिक स्थितीचा विचार करता आगामी अर्थसंकल्पातील तरतुदी कडक असतील, असे सूचित करताना कृषिमंत्री शरद पवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात स्वस्त पीक कर्ज योजनांसारख्या सवलतींवरदेखील पाणी सोडावे लागण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

ढासळलेला विकास दर, अनुदानाचा वाढलेला भार, फुगत चाललेली वित्तीय तूट आणि महसुली उत्पन्नाला लागलेली गळती अशा आव्हानात्मकवातावरणामध्ये वित्तमंत्री पी. चिदंबरम 28 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा यूपीए सरकारचा संपूर्ण वर्षाचा सादर केला जाणारा शेवटचा अर्थसंकल्प असेल.

वेळेवर कर्ज परतफेड करणा-या शेतक-या ंसाठी सध्या कृषी कर्जावर 4 टक्के व्याज देण्यात येत आहे. परंतु शेतक-यांना देण्यात येणा-या या कृषी कर्जावरील व्याज आणखी कमी होण्याची अपेक्षा आपणास वाटत नाही. उलट यंदाच्या अर्थसंकल्पातील तरतुदी कडक राहणार असल्यामुळे आपणास चिंता वाटत असल्याचे पवार यांनी एका मुलाखतीत सांगितले.

देशातील अर्ध्याहून अधिक शेतजमीन सिंचनाखाली आलेली नसल्याने अर्थसंकल्पात वित्तमंत्री जास्तीत जास्त निधी सिंचन प्रकल्पाला देतील अशी अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे ठिबक सिंचनासारख्या पाण्याची बचत करणा-या विविध योजनांसाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून दिला जावा, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.

परावलंबित्व कमी करणार : डाळी आणि तेलबियांची सरकारकडून खरेदी झाल्यास या पिकांचे उत्पादन वाढण्यास मदत होऊ शकेल काय, असे विचारले असता पवार म्हणाले की, स्पष्ट सांगायचे तर कोणताही शेतकरी या पिकांची विक्री सरकारला करीत नाही. बहुतांशपणे शेतक-या ंना बाजारात चांगली किंमत मिळते. परंतु काही वेळा मागणी आणि पुरवठ्यातील तफावतीमुळे त्यांना कमी किंमत मिळते. डाळी हे पावसावर आधारित पीक असून आयातीवरचे परावलंबित्व कमी करण्यासाठी जास्त उत्पन्न देणा-या जाती विकसित करणार आहोत.

Next Article

Recommended