आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसयूव्हीवरील शुल्कवाढ मागे घेणार नाही : अर्थमंत्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - शुक्रवारी संसदेत जाहीर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात स्पोर्टस् युटिलिटी व्हेइकल (एसयूव्ही) वरील उत्पादन शुल्कात 3 टक्के वाढ करण्यात आली होती. ही शुल्कवाढ मागे घेणार नसल्याचे अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सोमवारी संसदेत स्पष्ट केले.

अर्थमंत्री म्हणाले, अर्थसंकल्पात एसयूव्हीवरील उत्पादन शुल्कात 27 वरून 30 टक्के वाढ करण्यात आली होती. डिझेलवरील अनुदानामुळे मुख्यत: ही वाढ करण्यात आल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले, 98 टक्के एसयूव्ही डिझेलवर चालतात, त्यामुळे शुल्कवाढ अपरिहार्य होती.