आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात समोर येऊन परिस्थितीचा मुकाबला करणारे कणखर नेतृत्वच नाही - रतन टाटा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ढासळत्या अर्थव्यवस्थेसाठी अप्रत्यक्षपणे पंतप्रधानांना जबाबदार ठरवत रतन टाटा यांनी देशात समोर येऊन परिस्थितीचा मुकाबला करणारे कणखर नेतृत्वच नसल्याचे म्हटले आहे. भारताने जगाचा विश्वास गमावला आहे, सरकारने ही बाब समजून घेण्यात उशीर केला असल्याचे भाष्यही रतन टाटा यांनी केले आहे.


पंतप्रधान सिंग यांनी भारताची प्रतिष्ठा टिकवून ठेवली होती, मात्र काही दिवसांत आपण ती गमावून बसलो आहोत. गुंतवणूकदारांच्या विश्वासभंगाबद्दल पंतप्रधानांनी मौन बाळगले आहे. या संदर्भात टाटा म्हणाले, आपण (भारत) जगाचा विश्वास गमावून बसलो आहोत. आखलेल्या धोरणांची बरहुकूम अंमलबजावणी झाली असती तर चांगले ठरले असते. कोणत्या न कोणत्या कारणांमुळे सरकार खासगी क्षेत्रांसमोर मान झुकवते, असे टाटा म्हणाले.


1991 मधील सुधारणांच्या स्मृतींना उजाळा देत टाटा म्हणाले की, तेव्हा धाडसी पावले उचलली गेली होती. आजही तीच (मनमोहनसिंग) टीम आहे. मात्र माझ्या मते आज हितसंबंधांची भाऊगर्दी असलेले अनेक प्रतिस्पर्धी आहेत. मात्र हितसंबंधांचा विचार न करता भारतीय जनतेच्या दृष्टीने देशाचा विचार केला गेला पाहिजे. टाटांनी नरेंद्र मोदी यांची प्रशंसाही केली. गुजरातेत त्यांनी आपले कुशल नेतृत्त्व दाखवून दिले आहे, मात्र हीच किमया ते देशासाठीही करतील याबाबत आताच काही सांगता येणार नाही.