आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल कंपन्यांनी सेवा शुल्कवाढीत मनमानी करू नये : ट्राय

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बड्या मोबाइल सेवा पुरवठादार कंपन्यांनी केलेली दणकून भाडेवाढ भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) गंभीरपणे घेतली आहे. मोबाइल कंपन्यांना अन्य सेवांचे शुल्क तसेच कॉलचे दर निश्चित करण्यासाठी मोकळीक दिलेली असली तरी ती गृहीत धरू नये, अशा कानपिचक्या देतानाच भाडेवाढीत होणा-याबदलांवर ‘ट्राय’चे बारकाईने लक्ष असल्याचा इशाराही दिला आहे.

स्पर्धात्मक बाजारपेठेत जर मोबाइलचे भाडे कमी होत असेल तर त्या वेळी संयम ठेवणे योग्य आहे, परंतु ट्रायने ठेवलेला संयम किंवा मोबाइल कंपन्यांना भाडेदर निश्चित करण्यासाठी दिलेली मोकळीक याचा अर्थ आम्ही डोळे बंद केले आहेत असा होत नाही. मोबाइल कंपन्यांवर असलेला विश्वास आणि मोबाइल बाजारपेठेतील स्पर्धा लक्षात घेऊन हा संयम ठेवण्यात आला आहे. पण ही मोकळीक गृहीत असल्यासारखे समजून व्यवहार करू नये, असा स्पष्ट इशारा ट्रायचे अध्यक्ष राहुल खुल्लर यांनी दिला आहे.
चार महिन्यांत 30 टक्के वाढ
या चार आघाडीच्या मोबाइल कंपन्यांचा देशातील एकूण मोबाइल फोन जोडण्यांमध्ये 65 टक्क्यांपेक्षा जास्त वाटा असून ग्राहकांची संख्या जवळपास 58.41 कोटींच्या आसपास (नोव्हेंबर 2012 पर्यंत) नोंद झाली आहे. आयडिया सेल्युलर, व्होडाफोन, रिलायन्स कम्युनिकेशन्स या बड्या कंपन्यांनी गेल्या चार महिन्यांत आपल्या भाड्यात 20 ते 33 टक्क्यांनी वाढ केली आहे.

केवळ मोबाइलच नाही तर एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया सेल्युलर या कंपन्यांनी गेल्या महिनाभरामध्ये मोबाइल इंटरनेट सेवेच्या भाड्यातदेखील 25 ते 30 टक्क्यांनी वाढ केली असल्याचे दिसून आले आहे. बुधवारी एअरटेल, व्होडाफोन व आयडिया कंपन्यांनी दर वाढवले आहेत
स्पर्धा आयोगाकडे धाव : अन्य देशांच्या तुलनेत मोबाइल सेवांचे दर सगळ्यात कमी अशी भारताची ओळख आहे, परंतु मोबाइल कंपन्यांनी अलीकडच्या काळात भाडेवाढीची चढती भाजणी सुरू केली आहे. भारती एअरटेल, रिलायन्स कम्युनिकेशन्स, आयडिया सेल्युलर आणि व्होडाफोन या आघाडीच्या मोबाइल सेवा पुरवठादार कंपन्यांनी सातत्याने भाडेवाढ सुरूच ठेवली आहे. टूजी स्पेक्ट्रम प्रकरणातील एक याचिकादार असलेल्या एका स्वयंसेवी संस्थेने यासंदर्भात भारतीय स्पर्धा आयोगाकडे संपर्क साधला असून ‘ट्राय’लाही या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी सांगितले आहे.

मिनिटांत कपात करून लढवली नवी शक्कल भाडेवाढीच्या तिस-याफेरीमध्ये एअरटेल आणि आयडिया यांनी भाडेवाढ करण्यासाठी वेगळी क्लृप्ती लढवली. या कंपन्यांनी ग्राहकांना प्रोत्साहनपर योजना देताना संभाषणासाठी मिळणा-यामोफत मिनिटांचे दर 10 ते 25 टक्के या श्रेणीत कमी केले आणि कॉलरेट आणि अन्य सेवांसाठी देण्यात येणा-यासवलतींसाठी असलेल्या ‘स्पेशल टेरिफ व्हाऊचर’च्या दरात वाढ केली. व्हाडाफोननेदेखील याच पावलावर पाऊल टाकण्याचे संकेत दिले आहेत, परंतु दूरसंचार नियामक प्राधिकरणाने मात्र मोबाइल कंपन्यांकडून वारंवार सुरू असलेल्या भाडेवाढीबद्दल चिंता व्यक्त करतानाच आधी एका कंपनीने ही वाढ केली आणि त्यानंतर दोन दिवसांत अन्य कंपन्यांनी केली. त्यामुळे या कंपन्यांमध्ये काही संबंध आहे काय, असा सवालही ट्रायच्या अध्यक्षांनी केला.