आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - आर्थिक संकटाच्या धावपट्टीवर रखडलेल्या किंगफिशर विमान वाहतूक कंपनीच्या व्यवस्थापनावर भरवसा नसल्याचे विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) म्हटले आहे. किंगफिशर जोपर्यंत पूर्ण रकमेचा भरणा करत नाही, तोपर्यंत त्यांना विमान उड्डाणांची परवानगी देता येणार नसल्याचे एएआयने स्पष्ट केले.
एएआयच्या उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, आम्ही किंगफिशर व्यवस्थापनाच्या पोकळ दाव्यांवर विश्वास ठेवू शकत नाही. विमान उड्डाणे सुरू करण्यापूर्वी किंगफिशरने पूर्ण रकमेचा भरणा करणे इष्ट राहील. किंगफिशरकडे एएआयची 290 कोटी रुपये थकबाकी आहे.
किंगफिशरची पुनरुज्जीवन योजना आधीच बासनात आहे. कंपनीच्या अभियंत्यांनी आठ महिन्यांचे थकीत वेतन देण्याची मागणी करत न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची धमकी दिली आहे. कंपनी बंद करण्याबाबत याचिका दाखल करण्याचा इशारा या अभियंत्यांनी दिला आहे. तर किंगफिशरमधील माजी पायलटांचा एक गट या मुद्द्यावरून न्यायालयात गेला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.