आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nokari Job Speak Index News In Marathi, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवीन नोक-यांच्या संधी १८ टक्क्यांनी वाढल्या, नोकरी जॉब स्पीक निर्देशांकात वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नोकरी बाजारात सध्या नव्या संधींना चांगले दिवस आले आहेत. विशेषकरून दूरसंचार, आयटी आणि बीपीओ या क्षेत्रांमध्ये मागणी आल्यामुळे ऑगस्टमध्ये नोक-यांचे प्रमाण १८ टक्क्यांनी वाढले आहे. येणा-या महिन्यांमध्येदेखील हा वाढता कल असाच राहील, असे एका अहवालात म्हटले आहे.

नोकरी जॉब स्पीक निर्देशांक ऑगस्ट महिन्यात १४७८ वर गेला असून मागील वर्षातल्या याच कालावधीच्या तुलनेत त्यात १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. परंतु मासिक आधारावर तुलना करता जुलै महिन्याच्या तुलनेत हे प्रमाण १०.३६ टक्क्यांनी कमी झाले असल्याचे इन्फोएज इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष (विपणन) सुमीत सिंग यांनी सांगितले. दूरसंचार आणि बीपीओ क्षेत्रांनी अनुक्रमे ३६ आणि २६ टक्क्यांची वाढ नव्या नोक-यांमध्ये झाली आहे. माहिती तंत्रज्ञान, बँक, वाहन, औषध क्षेत्रात नोक-यांचे प्रमाण वाढले आहे.