नोकियाने लॉन्‍च केला / नोकियाने लॉन्‍च केला सर्वात स्‍वस्‍त मोबाईल

बिझनेस ब्‍युरो

Apr 13,2012 11:14:08 AM IST

स्‍वस्‍त मोबाईल पुरवण्‍याच्‍या स्‍पर्धेत जगातील अग्रणी कंपनी नोकियानेदेखील उडी मारली आहे. नोकियाने लॉन्‍च केलेला 103 मॉडेल हे त्‍यांचे आतापर्यंतचा सर्वात स्‍वस्‍त हँडसेट असल्‍याचे बोलले जाते. सध्‍या हा हँडसेट नायजेरियामध्‍ये लॉन्‍च करण्‍यात आला आहे.
या ब्‍लॅक अँन्‍ड व्‍हाईट हँडसेटचा डिस्‍पले हा 1.36 इंचाचा असून याचे वजन फक्‍त 77 ग्रॅम इतके आहे. याला 800 एमएएचची बॅटरी असून 27 दिवसांपर्यंत याचा स्‍टँडबाय टाईम आहे. या बॅटरीमुळे 11 तासांचा टॉकटाईम मिळतो. याशिवाय या हँडसेटमध्‍ये फ्लॅशलाईट, 3.5 एमएम ऑडियो जॅक, प्रीलोडेड गेम आणि एफएमचीही सुविधा आहे. हा हँडसेट सध्‍या फक्‍त नायजेरियामध्‍येच विकला जात असून लवकरच कंपनी याला भारतात आणण्‍याचा विचार करीत आहे.

X
COMMENT