आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघ्‍या 4999 रूपयांत बुक करा भारताचा पहिला फेसबुक फोन, फीचर्समध्‍येही आहे टॉप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोकियाने भारतातला पहिला डेडिकेटेड फेसबुक फोन लॉंच केला आहे. फोनची प्री-‍बुकींग ऑर्डर सुरू झाली आहे. नोकियाचा हा फोन आशा 210 क्‍वॉर्टी फोन आहे, आणि हा भारतीय गॅझेट बाजारात ब्‍लॅकबेरी आणि एचटीसीच्‍या फेसबुक फोनला चांगलीच टक्‍कर देऊ शकतो. नोकिया आशा 210 दोन व्‍हर्जनमध्‍ये लॉंच करण्‍यात आला आहे. सिंगल सिम आणि ड्यूल सिम. विशेष म्‍हणजे, एचटीसीचा डेडिकेटेड फेसबुक फोन HTC First अद्याप भारतात आलेला नाही.

नोकियाने सोशल मीडियावर युवा वर्गाची पडणारी उडी पाहून फेसबुक, वाइबो आणि व्‍हॉटसअपशीही भागीदारी केली आहे. या फोनमध्‍ये एक डेडिकेटेड व्‍हॉटसअप बटनही देण्‍यात आले आहे.

यापूर्वी नोकियाने आशा सीरिजचे 305, 306, 311 आणि 310 मॉडेल लॉंच केले होते. आशा 210 पहिले मॉडेल आहे, ज्‍यामध्‍ये डेडिकेटेड व्‍हॉटसअप बटन दिले आहे. कंपनीने याचा लुकही काही प्रमाणात ल्‍युमिया सीरिजसारखा ठेवला आहे. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या या फोनच्‍या डिझाईन, कॅमेरा, फीचर्स आणि लुकबद्दल...