Home | Business | Gadget | nokia-bringing-new-swiping-gestures-to-s40-feature-phones

लॉन्‍च होत आहे तीन स्‍क्रीन असलेला नोकियाचा जबरदस्‍त फोन

बिझनेस ब्‍युरो | Update - Apr 09, 2012, 11:07 AM IST

पहिल्‍या स्‍क्रीनवर अ‍ॅप्‍स असेल तर दुस-या स्‍क्रीनवर शॉर्टकट्स आणि तिस-या स्‍क्रीनवर सर्वात जास्‍त वापरल्‍या जाणारे अ‍ॅप्‍स असतील.

  • nokia-bringing-new-swiping-gestures-to-s40-feature-phones

    मोबाईल क्षेत्रातील अव्‍वल कंपनी नोकिया एक अनोखा फिचर्स असलेला हँडसेट लॉन्‍च करण्‍याच्‍या तयारीत आहे. नोकिया एस-40 या मॉडेलमध्ये एकापेक्षा एक अशा जबरदस्‍त फिचर्सचा समावेश आहे. या मॉडेलचे वैशिष्‍टय म्‍हणजे स्‍वाईप जेस्‍चर ज्‍यामध्‍ये असतील तीन होमस्‍क्रीन.
    पहिल्‍या स्‍क्रीनवर अ‍ॅप्‍स असेल तर दुस-या स्‍क्रीनवर शॉर्टकट्स आणि तिस-या स्‍क्रीनवर सर्वात जास्‍त वापरल्‍या जाणारे अ‍ॅप्‍स असतील. या सर्व स्‍क्रीन स्‍वाईप करून पाहता येतात. मोबाईलची स्‍क्रीन डाव्‍या किंवा उजव्‍या बाजूस स्‍वाईप करून स्‍क्रीन बदलता येते. मोबाईलच्‍या वरच्‍या बाजूने खाली स्‍वाईप केल्‍यानंतर मिस्‍ड, डायल आणि रिसीव्‍ह कॉलची माहिती मिळेल. विशेषत: अशा सुविधा नोकियाच्‍या स्‍मार्ट फोनवर असतात. याबाबतची विस्‍तृत माहिती हे मॉडेल लॉन्‍च झाल्‍यानंतरच समजू शकेल. तोपर्यंत आपल्‍याला वाट पाहावी लागेल.

Trending