आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Nokia ने 1838 रुपयांत लॉन्च केला 29 दिवसांचा बॅटरी बॅकअप देणारा फोन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Microsoft ने आपला बहुचर्चित फोन 'Nokia 215' नुकताच लॉन्च केला आहे. 'Nokia 215' हा बजेट फोन आहे. 29 दिवसांचा बॅटरी बॅकअप हे या फोनचे खास वैशिष्ट्य आहे. एकदा बॅटरी चार्ज केली की, 29 दिवस त्याच्याकडे पाहाण्याची गरज नाही, असे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले आहे. इंटरनेट यूजर्सला डोळ्यासमोर ठेवून लॉन्च करण्यात आला आहे. या फोनमध्ये 'Facebook', Massagers, Twitter, Big Serach सारखे प्री-लोडेड Apps देण्यात आले आहेत.

'Nokia 215' हा फोन ड्युअल सिम असून त्याची किंमत फक्त 1838 रुपये (जवळपास 29 डॉलर्स) आहे. Nokia 215 हा फोन 2015 च्या पहिल्या तिमाहीत मिडिल ईस्ट, आफ्रिका, आशिया आणि युरोपमधील अनेक देशांमध्ये लॉन्च करण्यात येणार आहे.
Nokia 215 (सिंगल सिम) आणि Nokia 215 (ड्युअल सिम) लॉन्च करण्यात आले आहे. दोन्ही हॅंडसेट्स मायक्रो सिम सपोर्ट करतात. Nokia चा हा सगळ्यात स्वस्त फोन आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, Nokia 215 चे स्मार्ट फीचर्स...