आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता आला नोकियाचा सगळ्यात स्वस्त कलर मोबाइल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आघाडीची मोबाइल निर्माता कंपनी 'नोकिया'ने आपला सगळ्यात स्वस्त हँडसेट ‘नोकिया 105’ मंगळवारी भारतीय बाजारातलॉन्च केला आहे. नोकियाचा हा कलर मोबाइल असून त्याची किंमत 1,249 रुपये इतकी आहे. ‘नोकिया 1280’चे हे नवे व्हर्जन असल्याचे बोलले जात आहे.

'नोकिया 105'मध्ये एफएम रेडीओ आणि फ्लॅश लाईट आदी सुविधा उपलब्ध आहेत. उल्लेखनीय म्हणजे यापूर्वी लॉन्च केलेल्या 'नोकिया 1280' ची विक्रमी 10 कोटींपेक्षा जास्त विक्री झाली होती.

दूसरीकडे सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍सने भारतीय बाजारात स्‍मार्ट टीव्ही आणि एलईडी टीव्हींची मालिका सादर केली आहे. फूजी फिल्म इंडियाने भारतीय बाजारात पहिला 3 डी कॅमरा 'फाइनपिक्स रियल 3 डी' लॉन्च केला आहे. 10 मेगापिक्सेलच्या कॅमेराने 3डीसोबत 2डी फोटोग्राफीही करता येते. या कॅमेराची किंमत 39,999 रुपये आहे.