आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

NOKIAचा अँड्रॉइड स्मार्टफोन \'X2\' लॉन्च; जाणून घ्या, \'X\' पेक्षा काय आहे खास!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
NOKIA ने अँड्रॉइड सीरीजमधील आपला पहिला स्मार्टफोन 'X'चे नवे व्हर्जन मंगळवारी सादर केले. 'NOKIA X2' असे या मॉडेलचे नाव आहे. मागील अनेक दिवसांपासून इंटरनेटवर अनेक वेबसाइटने 'NOKIA X2'चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशनबाबत माहिती दिली जात होती. NOKIAची 'X' सीरीज अँड्रॉइड व्हर्जन असल्याने खूप लोकप्रिय होत आहे.

किंमत-
NOKIA कन्वर्सेशन ब्लॉगवर 'NOKIA X2'च्या किंमतीबाबत खुलासा केला आहे. लिस्टिंगनंतर अनेक देशांमध्ये हा फोन उपलब्ध करून दिला जाणार आहे. NOKIA X2 कोण-कोणत्या देशात विक्रीसाठी उपलब्ध होईल, याबाबत माहिती समजू शकलेली नाही. 'NOKIA X2' किंमत 8100 रुपये (कर वगळून) आहे.
* रॅम-
NOKIA X2 मध्ये 1 GB ची रॅम आहे. याआधी NOKIAने लॉन्च केलेल्या XL आत्रर X+ मध्ये 768 MBची रॅम होती. याशिवाय 'NOKIA X'मध्ये 512 MBची रॅम देण्यात आली आहे. 1 GB ची रॅम असल्याने 'NOKIA X2'मध्ये हेव्ही गेम्स आणि अॅप्स देखील डाउनलोड करता येऊ शकतात. नव्या 'NOKIA X2'मध्ये मल्टीटास्किंग कॅपेबिलिटी ही NOKIAच्या X, X+ आणि XL या व्हर्जनच्या तुलनेत जास्त आहे.

* स्क्रीन साइज-
'NOKIA X2'चा स्क्रीन 4.3 इंचाचा आहे. NOKIA X आणि X+ चा स्क्रीन 4 इंचाचा आहे. हालांकि, NOKIA XLचा स्क्रीन 5 इंचाचा आहे. परंतु, NOKIA X चे सक्सेसर असल्याने X2 स्क्रीन फीचर्स शानदार आहेत.
(फोटो: NOKIA X2)
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, 'NOKIA X2' के बाकी फीचर्स-