आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nokia Launches New Selfie Smartphone And Latest 830 Lumia

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

NOKIA ने लॉन्च केला पहिला सेल्फी स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सेल्फी फोन लुमिया 730)

गॅजेट डेस्क -
मायक्रोसॉफ्टने आज (4 सप्टेंबर) ला आपले तीन नवे लॅटेस्ट लुमिया स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. नोकिया लुमिया 830 (फ्लॅगशिप), लुमिया 730 (ड्यूअल सिम) किंमत 199 euros (जवळपास 15805.88 रुपये) आणि 4G फीचर असणारा लुमिया 735 असे या स्मार्टफोन्सची नावे आहेत.
नोकिया 830 हा लुमियाचा सर्वात स्लिम स्मार्टफोन आहे, तर नोकिया लुमिया 730 आणि 735 हे खास सेल्फी फीचरसाठी प्रसिध्द आहेत. नोकियाने या सर्वच स्मार्टफोन्सला चांगला फ्रन्ट कॅमेरा दिला आहे.
नवीन सेल्फी अॅप
कंपनीच्या नवे सेल्फी अॅप लुमिया 730 स्मार्टफोनमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. या सेल्फी अॅपच्या साह्याने रेअर कॅमेर्‍यानेही सेल्फी काढल्या जाऊ शकते. नोकीयाच्या या सेल्फी अॅपमध्ये फेस ट्रॅकींगची सुविधाही देण्यात आली आहे.
चांगले व्हिडीओ कॉल्स -
या नव्या सेल्फी स्मार्टफोनमध्ये व्हिडीओ कॉलिंग अजून चांगल्या प्रकारे केली जाऊ शकते. विंडोज कोरटाना (पर्सनल व्हाईस एसिस्टंट) च्या साह्याने स्काईपवरून व्हिडीओ कॉल्स अजून सहजतेने केल्या जाऊ शकतात. लुमिया 730 आणि 735 स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रन्ट कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा सामान्य फ्रन्ट फेसिंग कॅमेर्‍याच्या तुलनेत जास्त मोठा आहे. हा कॅमेरा जवळपास सोनीचा सेल्फी फोन एक्सपेरिया C3 प्रमाणेच आहे.

पुढील स्लाईडमध्ये जाणून घ्या, या सर्व नव्या विंडोज स्मार्टफोन्सचे फीचर्स -