आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nokia Lumia 730, 830 And 930 Launched In India Latest News In Divyamarathi

नोकियाने भारतात लॉन्च केले \'ल्युमिया\' सीरिजमधील तीन विंडोज सेल्फी स्मार्टफोन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: ल्युमिया 830 आणि 730 सेल्फी फोन लॉन्च करताना अजय मेहता)
नवी दिल्लीत झालेल्या एका इव्हेंटमध्या 'नोकिया'ने तीन ल्युमिया सीरिजमधील तीन लेटेस्ट स्मार्टफोन्स लॉन्च केले आहे. 'ल्युमिया 930', 'ल्युमिया 730' आणि 'ल्युमिया 830' अशी सेल्फी स्मार्टफोनची नावे आहेत. विशेष म्हणजे या इव्हेंटला मायक्रोसॉफ्ट इंडियाचे नवनिर्वाचित मॅनेजिंग डायरेक्टर अजय मेहता उपस्थित होते.

न्यू सेल्फी अॅप-
नोकियाने आपले न्यू सेल्फी अॅप 'ल्युमिया 730' स्मार्टफोनमध्ये लॉन्च केले आहे. 'सेल्फी अॅप'च्या मदतीने रिअर कॅमेर्‍याने अगदी सहज 'सेल्फी' घेता येते. नोकियाचा हे सेल्फी अॅप फेस ट्रॅकिंग देखील करेल.

शानदार व्हिडिओ कॉल्स-
न्यू सेल्फी स्मार्टफोनमध्ये शानदार व्हिडिओ कॉलिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 'ल्युमिया 730' मध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. त्याचा अँगल अन्य फ्रंट फेसिंग कॅमेराच्या तुलनेत जास्त रुंद आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर तो सोनीचा सेल्फी फोन 'एक्सपीरिया C3' सारखा आहे. नोकिया ल्युमिया 830 मध्येही अशा प्रकारचे फीचर्स उपलब्ध आहेत.

1 TB फ्री क्लाउड डाटा-
नोकियाने या तिन्ही ल्युमिया स्मार्टफोन्समध्ये वन ड्राइव्ह क्लाउड स्टोरेज यूजर्सला अगदी मोफत मिळणार आहे. 1 टीबी क्लाउड स्टोरेजमध्ये जवळपास 31 हजार फोटोज बसू शकतात. ही सुविधा सहा महिन्यांसाठी असेल. त्यानंतर यूजर्सला 10 रुपये प्रति महिना दर लागेल.
नोकिया 'ल्युमिया 730'ची किमत 15,299 रुपये असून 6 ऑक्टोबरपर्यंत हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.'ल्युमिया 830'ची किमत- 28,799 रुपये असून 8 ऑक्टोबरला बाजारात दाखल होईल. तर 'ल्युमिया 930'ची किमत 38,649 रुपये आहे. 15 ऑक्टोबरला हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होईल.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, नोकियाच्या तिन्ही सेल्फी स्मार्टफोन्सचे फीचर्स-