Home | Business | Gadget | nokia-n8-set-to-get-symbin-ann-update

नोकिया N 8 चा नवा आकर्षक लुक

बिझनेस ब्युरो | Update - Jun 14, 2011, 02:30 PM IST

नोकिया एन 8 मध्ये आता आणखी आकर्षक फिचर्स मिळणार आहेत.

  • nokia-n8-set-to-get-symbin-ann-update

    मोबाईल सेव्हींसाठी आनंदाची बातमी आहे. नोकिया एन 8 मध्ये आता आणखी आकर्षक फिचर्स मिळणार आहेत. फिनलंडची ही मोबाईल बनविणारी कंपनी आपल्या एन 8 मॉडेलमध्ये काही महत्तावाचे बदल करणार आहे. एन 8 च्या ऑपरेटिंग सिस्टीमध्ये सिंबायन अन्नाचा वापर करण्याचा निर्णय नोकीयाने घेतला आहे. सिंबायन अन्ना ही कंपनीद्वारा डेव्हलप मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीममधील सर्वोत्कृष्ट सिस्टीम असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

    फोटोग्राफीचा छंद असणा-यांसाठी हा एक बेस्ट ऑप्शन असणार आहे. नोकिया एन 8 मध्ये ऑटोफोकस आणि 30 एफपीएस (फ्रेम पर सेकंद) कॅमेरा असणार आहे. हा नवा एन 8 येत्या काही महिन्यातच बाजारात येणार असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे. मात्र नव्या एन 8 च्या किंमतीबद्दल माहिती देण्याचे त्यांनी टाळले.

Trending