ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी येतोय नोकिया एन ९
agency | Update - Jun 21, 2011, 12:26 PM IST
नोकियाचा हँडसेट एन ८ ला मिळालेल्या यशामुळे कंपनी लवकरच एन ९ हँडसेट बाजारात आणणार आहे.
-
बाजारात नोकियाचा हँडसेट एन ८ ला मिळालेल्या यशामुळे त्यांचा एन ९ कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता ग्राहकांची प्रतीक्षा संपली असून, कंपनी लवकरच एन ९ हँडसेट बाजारात आणणार आहे.
कंपनीने या स्मार्ट हँडसेटचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. हा हँडसेट तीन वेगवेगळ्या रंगांमध्ये ग्राहकांपर्यंत पोचणार आहे. मात्र, या हँडसेटची किंमत आणि लाँचिंग केव्हा होणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. या हँडसेटमध्ये १२ मेगापिक्सल कॅमेरा असणार आहे. तसेच माइक्रो सिमकार्डचा वापर करण्यात येणार आहे. बाजारात नोकियाचे नाव होत असून, या हँडसेटमुळे त्यांचे बाजारातील स्थान वाढण्यास मदत होणार आहे.