Home | Business | Gadget | nokia no one brand in india, market survey

भारतीय बाजारपेठेत नोकिया अजूनही नंबर एक 'ब्रॅण्ड'

Agency | Update - Jul 10, 2011, 04:20 PM IST

मोबाईल बनविणारी नोकिया कंपनी आजही भारतात आपलं वर्चस्व कायम ठेवून आहे. या क्षेत्रातील अनेक दिग्गज कंपन्यांची मोठी स्पर्धा असतानाही नोकियाने आपली आघाडी कायम ठेवत नंबर एक स्थानावर आहे.

  • nokia no one brand in india, market survey

    नवी दिल्ली- होय, मोबाईल बनविणारी नोकिया कंपनी आजही भारतात आपलं वर्चस्व कायम ठेवून आहे. या क्षेत्रातील अनेक दिग्गज कंपन्यांची मोठी स्पर्धा असतानाही नोकियाने आपली आघाडी कायम ठेवत नंबर एक स्थानावर आहे.
    फिनलैंड या कंपनीने भारतीय बाजारपेठेत धुमाकूळ घातला आहे. कंपनीने केलेल्या एका सर्वेक्षणात असे दिसून आले की, जुलै २०११ पर्यंत भारतीय बाजारपेठेत नोकिया कंपनीच्या मोबाईलाच ग्राहकांनी सर्वाधिक मागणी केली आहे. देशांत सध्या १०० मोबाईलमागे नोकिया कंपनीचे ४८ मोबाईल आहेत. याचे सर्वेक्षण मोबाईल इंडियन बेवसाइट यांनी केले आहे. यात दुसरा क्रमांक कोरियाची कंपनी सॅमसंगने पटकावला आहे. यात सहा मॉडेल या यादीत असून त्यात एक सीडीएमए या प्रकाराचा समावेश आहे. सॅमसंग भारतीय बाजारपेठेत ही दोन क्रमांकावर आहे.
    मायक्रोमॅक्स व सोनी एरिक्सन तिसऱया क्रमांकावर आहे. त्याचे दोन-दोन मॉडेलचा यादीत समावेश आहे. डेल, एचटीसी आणि आयफोन यांच्या एका मॉडेलचा समावेश आहे.
    नोकिया सी ५-०३ याने प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्याची किंमत ८, ६०० रुपये आहे. या मॉडेलची ग्राहकांकडून सर्वाधिक चौकशी केली जाते. नोकिया सी-६ दुसऱया क्रमांकावर आहे. त्याची किंमत १२,२०० रुपये आहे. नोकिया एक्स-७ तिसऱया क्रमांकावर आहेत. त्याची किंमत १८,००० रुपये आहे.

Trending