Home | Business | Gadget | nokia offers new smartfone mobile

नोकिया आणणार आता 'सोन्याचा' स्मार्टफोन मोबाईल

agency | Update - May 31, 2011, 10:56 PM IST

जगातील सर्वांत मोठी मोबाईल कंपनी नोकिया आपण कायम टॉपवर रहावे म्हणून सतत नवनवीन मोबाईलचे मॉडेल बाजारात आणत असते. म्हणूनच त्यांनी नुकताच एक सोन्याचा स्मार्टफोन मोबाईल बाजारात आणत असून त्याची काही खास वैशिष्टे आहेत.

  • nokia offers new smartfone mobile

    smart_fone_288जगातील सर्वांत मोठी मोबाईल कंपनी नोकिया आपण कायम टॉपवर रहावे म्हणून सतत नवनवीन मोबाईलचे मॉडेल बाजारात आणत असते. म्हणूनच त्यांनी नुकताच एक सोन्याचा स्मार्टफोन मोबाईल बाजारात आणत असून त्याची काही खास वैशिष्टे आहेत.
    या स्मार्ट मोबाईलचे प्लेटिंग सोन्याने केले असून, त्याचे नाव ओरो असे ठेवण्यात आले. हा लग्झरी फोन दिसण्यास सुंदर तर आहेच शिवाय तांत्रिकदृष्ट्या तो जास्त उपयुक्त आहे. मोबाईलच्या समोरचा भाग (प्लेटेड) सोन्याचा बनवलेला आहे. मोबाईलच्या पाठिमागचा भागही मजबूत व स्क्रैच प्रूफ असून चांगल्या दर्जाच्या चामडी कातड्य़ापासून बनविले आहे. त्याच्यासमोरच्या भागात क्रिस्टलचे बटन बसविले आहे. त्याच्या गोल्ड फ्रेममध्ये गोरिल्ला ग्लास लावली असून त्यामुळे हा मोबाईल पीस अतिशय आकर्षक व स्टायलिश दिसतो.

    या मोबाईलची आणखी एक खासियत अशी की, याची ब्लू टूथ सोन्याची आहे. ८ मेगापिक्सल कॅमेरा असलेल्या या मोबाईलमध्ये डयुल एलई़डी फ्लॅश असून उच्च दर्जाच्या व्हिडिओ रेकॉडिंगचीही सोय आहे. मोबाईल सिंबियन सॉफ्टवेअरवर आधारित असून त्याची स्टोरेज कॅपासिटी ८ जीबीच्या घरात आहे.
    एवढा उत्तम मोबाईल असूनही नोकिया कंपनी त्याची किंमत केवळ ५ हजार ९९० रुपये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी हा मोबाईल सप्टेंबरमध्ये बाजारात आणणार आहे.Trending