आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकिया ‘टॉप’ ब्रॅँड

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मोबाइल बाजारात कितीही नवनवीन हॅँडसेट येत असले तरी ब्रॅँड विश्वासार्हतेबाबतीत नोकिया हाच देशातील सर्वात विश्वासार्ह ब्रॅँड असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. ट्रस्ट रिसर्च अ‍ॅडव्हायझरी या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या नवीन वर्षातील ‘ब्रॅँड ट्रस्ट’ अहवालामध्ये नोकिया सलग दुस-या वर्षी टॉप ब्रॅँड ठरला आहे. टाटा ब्रॅँड मात्र दुस-या वर्षीही द्वितीय स्थानावर राहिला आहे.
मागील वर्षी तिस-या क्रमांकावर असलेल्या जपानच्या सोनी कंपनीला कोरियातील दोन कंपन्यांनी टक्कर दिली आहे. परिणामी टॉप ब्रॅँडमध्ये सोनी पाचव्या क्रमांकावर फेकल्या गेली असून एलजी आणि सॅमसंग तिस-या स्थानावर आल्या आहेत. वाहन निर्मितीत आघाडीवर असलेली मारुती सुझुकी गेल्या वर्षीच्या तुलनेत एक पायरी वर चढून यंदा सहावा सर्वात विश्वासार्ह ब्रॅँड ठरला आहे.
देशातील 61 कंपन्यांच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला असून त्यासाठी 2 हजार 718 व्यक्तींना या सर्वेक्षणात सहभागी करून घेण्यात आले होते. टॉप ब्रॅँडची निवड ही विविध 61 निकषांवर आधारित असून भारतीय सांख्यिक संस्थेच्या वतीने ब्रॅँड विश्वासार्हता निर्देशांक तयार करण्यात आल्याचे ट्रस्ट रिसर्च अ‍ॅडव्हायझरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. चंद्रमौळी यांनी सांगितले. टॉपटेनमध्ये बजाजने पहिल्यांदाच प्रवेश करताना सातवा क्रमांक पटकावला आहे.
अन्य क्षेत्रातील ‘टॉप’ ब्रॅँड
फॅशन : अरमानी ; बांधकाम : डीएलएफ ; शिक्षण : एनआयआयटी; ऊर्जा : ओएनजीसी, मनोरंजन : पीव्हीआर; आरोग्य : डाबर; इंटरनेट : गुगल; उत्पादन : एसीसी; आदरातिथ्य : ताज हॉटेल्स; सेवा : थॉमस कूक, समाजिक : बिर्इंग ह्युमन; तंत्रज्ञान : ह्युलेट पॅकार्ड; विमान कंपन्या : एअर इंडिया