NOKIA लवकरच अॅन्ड्राइड ऑपरेटिंग सिस्टम असणारा लो बजेट स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका रिपोर्टनूसार MICROSOFT सोबत करार केल्यानंतरही ही फिनिश कंपनी अॅन्ड्राइड ऑपरेटिंग सिस्टम असणारा स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या बाबतीत कसलीही माहिती देण्यासाठी NOKIA आणि MICRPSOFT या दोन्ही कंपन्यानी नकार दिला आहे.
अॅन्ड्राइड मोबाइलची वाढती लोकप्रियता पाहून NOKIAने हे पाउल उचलले आहे. 3000 ते 60000 रेंजमधील अनेक अॅन्ड्राइड स्मार्टफोन्स बाजारात उपलब्ध आहेत. फर्म स्ट्रॅटेजी अॅनलेटिक्सकडून मिळालेल्या माहितीनूसार एका वर्षात जगभरात विकल्या गेलेल्या स्मार्टफोन्सपैकी 79 टक्के स्मार्टफोन्स अॅन्ड्राइड होते. याबरोबरच 15 टक्के APPLE चे स्मार्टफोन्स विकले जातात तर केवळ 4 टक्के विंडोज स्मार्टफोन्सला ग्राहक प्रसंती देतात.
24 फेब्रुवारीला स्पेनमध्ये होणा-या मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये (MWC 2014) NOKIA हा स्मार्टफोन लॉन्च करू शकतो.