नोकिया एक्स : / नोकिया एक्स : अँप्सच्या विश्वातील स्वस्त, स्मार्ट पर्याय

Mar 11,2014 08:39:00 AM IST

मुंबई- ‘ल्युमिया’ला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर आता स्मार्टफोनच्या बाजारातील तीव्र स्पर्धेत आता ‘नोकिया एक्स’ या अँड्रॉइड अँप्लिकेशनवर चालणार्‍या आणखी एका फोनची भर पडली आहे. विशेष म्हणजे ‘नोकिया एक्स’ र्शेणीतील हा सर्वात किफायतशीर फोन असून याच श्रेणीतील ‘एक्स +’ आणि ‘एक्सएल’ हे आणखी दोन फोन मे महिन्यापर्यंत बाजारात येण्याची शक्यता आहे.

संपूर्ण जगभरात भारत ही झपाट्याने विस्तारत असलेली स्मार्टफोनची बाजारपेठ असून नोकिया एक्सच्या माध्यमातून त्यात आणखी एक भर पडली आहे. परंतु स्वस्तातल्या स्मार्टफोनमुळे आशा र्शेणीतील मोबाइल फोन्सला फटका बसणार नाही, असे नोकिया इंडियाचे व्यवस्थाकीय संचालक पी. बालाजी यांनी या फोनच्या अनावरणप्रसंगी सांगितले.
ल्युमियासारख्या उच्च र्शेणीतील स्मार्टफोनसाठी नोकिया एक्स पूरक ठरणार आहे. त्याचबरोबर ल्युमिया वापरण्याअगोदर ग्राहकांना स्काइप आणि आऊटलूकसारख्या मायक्रोसॉफ्ट सेवांचा अनुभव घेता येऊ शकेल, असे बालाजी यांनी सांगितले.


वैशिष्ट्ये काय ?
0 नोकिया एक्सच्या वापरकर्त्यांना गुगल प्ले प्राप्त करण्याची तसेच मायक्रोसॉफ्ट अँप किंवा अन्य तिसर्‍या अँप स्टोअरच्या मदतीने अँँड्रॉइड अँप साइडलोड करणे शक्य
0 ‘‘फास्टलेन सुविधेमुळे विविध आवडत्या अँप्समध्ये सहज प्रवेश करणे शक्य. नोकिया स्टोअरच नव्हे, तर एक डझनपेक्षा अधिक क्युरेटेड अँसप्सशी संपर्क. ब्लॅकबेरी मेसेंजर (बीबीएम), ट्विटर, फेसबुक, प्लॅन्टस, झोम्बीज खेळ समाविष्ट
0 ऑफलाइन मॅप्स आणि रस्त्याच्या प्रत्येक वळणानुसार दिशादिग्दर्शन करण्याची सुविधा. एचईआरई मॅप्स आणि विनामूल्य गाणी डाऊनलोड करण्यासाठी ‘नोकिया मिक्सरेडिओ’ सुविधा
0 वनड्राइव्हद्वारे सात जीबी विनामूल्य क्लाऊड साठवणूक सुविधा
0 अवघ्या 10.4 मिलिमीटर जाड, अतिशय सडपातळ व टिकाऊ मोनोबॉडी डिझाइनच्या या ओरखडेमुक्त चार इंची पडदा, पृष्ठभाग वेगवेगळ्या रंगांनी बदलण्याची सुविधा. तीन मेगापिक्सल कॅमेरा, 512 एमबी रॅम, एक गीगार्हट्झ ड्युएल कोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर

संभाव्य किमती
7,500 रु. नोकिया एक्स
9,200 रु. नोकिया एक्सएल
8,400रु. नोकिया एक्स प्लस
8,599 रु. नोकिया एक्स

X

Recommended News