आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात लॉन्च झाला NOKIA X अ‍ॅन्ड्राइड, किंमतीसह जाणून घ्या फिचर्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोकियाचा पहिला अ‍ॅन्ड्राइड स्मार्टफोन नोकिया x लॉन्च झाला आहे. मुंबईत झालेल्या एका इवेंटमध्ये हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. कंपनीने या स्मार्टफोनची किंमत 8,599 रूपये ठेवली आहे. काही दिवसांपूर्वी ऑनलाइन स्टोअर्सवर हा मोबाइल 8500 रूपयांत मिळत होता. स्मार्टफोन लॉन्च झाल्यानंतर लगेचच TheMobileStore ऑनलाइन स्टोअरवर या मोबाइलची किंमत 250 रुपयांनी कमी झाली आहे. 8349 रूपयांत तुम्ही TheMobileStore वर हा स्मार्टफोन विकत घेऊ शकता. ही सीरीज लुमिया आणि आशा सिरीजमधील गॅप भरून काढेल अशी अशा आहे.
वैशिष्टे
- आकर्षक डिझाइन
- सोपे नोटिफिकेशन सेटिंग
- नकाशे, मिक्स रेडीओ, स्काइप, क्लाउड स्टोअरेज, MS आउटलूकसारखे अ‍ॅप्स
- कमी किंमत
काय कमी आहे
- फिक्स्ड फोकस कॅमेरा, ऑटोफोकस कॅमे-याची कमी
- फेक अ‍ॅन्ड्राइड
- गुगल प्ले स्टोअरवरला अ‍ॅक्सेस नाही.
गुगल सर्विस्ची कमी
नोकिया X सीरीजचे, नोकिया X+ आणि नोकिया XL हे मोबाइल अद्याप लॉन्च झालेले नाहीत. हे दोन्ही स्मार्टफोन दोन महिन्यात भारतात येतील असे कंपनीचे म्हणणे आहे.
(नोट: नोकिया X की किंमत MOP (Market Operative Price)नूसार दिलेली आहे त्यामुळे MRP ज्यास्त असू शकते.)
नोकिया X चे फिचर्स जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...