आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nokia X2: The Nokia X Successor With 4.3 inch Display,

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोकिया एक्स 2 वर मिळणार मायक्रोसॉफ्टचे अॅप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मायक्रोसॉफ्ट डिव्हायसेसने अँड्रॉइडवर चालणारे नोकिया एक्स श्रेणीतील नवे मॉडेल नोकिया एक्स 2 सादर केले. याची किंमत 99 युरो (सुमारे 8100 रुपये) आहे. सॅमसंग, एचटीसी आणि चीनच्या जियोनी, हुवेई व झेडटीई आदी कंपन्यांकडून होणार्‍या स्पर्धेचा विचार करून कंपनीने आता वाजवी किमतीतील स्मार्टफोन विस्तारावर लक्ष केंद्रित केले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार सध्या हा हँडसेट जगातील निवडक देशांत उपलब्घ राहील.

स्पाइसचा ड्युएल सिम स्मार्टफोन, रु. 9999 मध्ये
स्पाइस मोबाइलने अँड्रॉइड श्रेणीतील आणखी एक नवा स्मार्टफोन स्टेलर 600 नुकताच सादर केला. या स्मार्टफोनची किंमत 9999 रुपये आहे.
मायक्रोसॉफ्टचे स्काइपे, आऊटलूक डॉट कॉम आणि वनड्राइव्ह हे अँप दिसतात. 7 जीबी स्टोअरेज क्षमता.
वैशिष्ट्ये
1.2 गीगाहर्ट्झ ड्युएल कोअर स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, ड्युएल सिम हँडसेट, 4.3 इंचांचा क्लिअर ब्लॅक डिस्प्ले, 5 एमपी कॅमेरा, वन जीबी रॅम, 4 जीबी रॅम मेमरी (32 जीबीपर्यंत विस्तारित करता येणारी)

टच स्क्रीनमध्ये जी सेन्सर
4.4 अँड्रॉइड किटकॅट ऑपरेटिंग सिस्टिम
1.3 गीगाहर्ट्झ क्वाडकोअर प्रोसेसर
1 जीबी रॅम आणि 32 जीबी विस्तारित मेमरी
8 मेगापिक्सेल रिअर तर 3.2 एमपी फ्रंट कॅमेरा
6 इंच टचस्क्रीन जी सेन्सरयुक्त डिस्प्ले