आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nokia\'s Most Affordable Windows Phone 8 Launched In India

नोकियाने भारतात लाँच केला सर्वात स्वस्त विंडोज स्मार्टफोन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोबाईल बाजारातील प्रसिद्ध ब्रँड नोकियाने भारतात गुरुवारी दोन मोबाईल लाँच केले. त्यातील एक विंडोज 8 स्मार्टफोन असून त्यांची किंमत १०,५०० आहे. एका आठवड्यात हा मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. नोकियाचा सर्वात अँडव्हान्स फोन लुमियाचे सर्वात स्वस्त व्हर्जन आहे. नोकियाने लुमिया 520 (सोबतच्या छायाचित्रातील) आणि लुमिया 720 भारतात लाँच केले आहेत.

लुमिया 520 ला चार इंचाचा स्क्रिन डिस्प्ले आहे. या फोनमध्ये विंडोज 8 ऑपरेटींग सिस्टिम आहे. या फोनचा कॅमेरा लुमिया 920 च्या दर्जाचा असून हा फोन पाच रंगामध्ये उपलब्ध आहे. एक गीगा हर्टज् ड्युएल प्रोसेसरवर हा फोन चालतो. यात 512 एमबी रॅम आहे. याचा कॅमेरा 5 मेगापिक्सल असून ऑटो फोकस आहे. तर, लुमिया 720 मध्ये 6.7 मेगापिक्सलचा कॅमेरा टु स्टेज कॅप्चरसह आहे.