आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जानेवारी महिन्यात निर्यातीमध्‍ये नाममात्र टक्क्‍यांनी वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - औद्योगिक उत्पादनाने निराशा केलेली असली तरी तब्बल आठ महिन्यांच्या घसरगुंडीनंतर निर्यातीने मात्र थोडाफार दिलासा दिला आहे. यंदाच्या जानेवारी महिन्यात निर्यातीमध्ये नाममात्र 0.82 टक्क्यांनी वाढ होऊन ती अगोदरच्या वर्षातल्या 25.37 अब्ज डॉलर्सवरून 25.58 अब्ज डॉलर्सवर गेली आहे.

आयातीचे प्रमाण 6.12 टक्क्यांनी वाढून ते आढावा कालावधीत 45.5 अब्ज डॉलरवर गेल्याने व्यापार तूट 20 अब्ज डॉलर्स नोंद झाली आहे, परंतु चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जानेवारी या कालावधीत सागरी निर्यात मात्र 4.86 टक्क्यांनी घसरून ती 239.6 अब्ज डॉलरवर गेली आहे. याच कालावधीत आयात 0.01 टक्क्यांनी वाढून 406.8 अब्ज डॉलर्सवर गेल्यामुळे पहिल्या 10 महिन्यांतील व्यापार तूट 167.16 अब्ज डॉलर्स झाली आहे.

जानेवारी महिन्यात तेल आयात 6.91 टक्क्यांनी वाढून ती अगोदरच्या 14.87 अब्ज डॉलरवरून 15.89 डॉलर्सवर गेली आहे. बिगर तेल आयात 5.71 टक्क्यांनी वाढून ती आढावा कालावधीत 29.68 रुपये झाली आहे.
तूट भरून काढणे शक्य जानेवारी महिन्यात निर्यातीमध्ये झालेल्या 0.8 टक्के वाढीमुळे व्यापार तूट भरून काढण्यास मदत होऊ शकेल, असा आशावाद वाणिज्य आणि उद्योगमंत्री आनंद शर्मा यांनी ‘नॅस्कॉम’च्या परिषदेत बोलताना व्यक्त केला. यंदाच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दहा महिन्यांत व्यापार तूट 167.16अब्ज डॉलरवर गेली आहे. व्यापार तूट वाढण्यासाठी तेल आणि सोने आयात प्रामुख्याने कारणीभूत आहे. सोन्याची वाढती आयात ही चिंतेची बाब असून आयात शुल्काबाबत समतोल दृष्टिकोन बाळगण्याची गरज आहे.

चढता आलेख समाधानी
जानेवारीत निर्यातीने दाखवलेला चढता आलेख समाधान देणारा आहे. यामुळे व्यापारी तूट कमी होण्यास मदत होणार आहे. मात्र, कच्च्या तेलाची आयात चिंताजनक आहे.
एस.आर.राव, वाणिज्य सचिव