आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not Necessary Stump Duty For Opening Demat Account

डिमॅट खाते उघडताना आता मुद्रांक शुल्काची गरज नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भांडवल बाजार नियंत्रक ‘सेबी’ने जाहीर केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार आता गुंतवणूकदारांना डिमॅट खात्यावरील करार झाल्यानंतर त्यासाठी स्टॅम्प ड्यूटी भरावी लागणार नाही. या नव्या नियमामुळे रोखे बाजारात
नोंदणी करताना गुंतवणूकदारांना येणारा खर्च वाचण्यास मदत होणार आहे.
डिपॉझिटरी पार्टिसिपंट आणि डिमॅट खातेदारांमध्ये होणा-या कराराच्या स्वरूपात बाजार नियंत्रकांनी अलीकडेच बदल केला असून त्या बदल्यात हक्क आणि जबाबदा-या हा सामाईक आणि सुलभ असा दस्तऐवज तयार करण्यात आला आहे. कराराच्या नव्या दस्तऐवजानुसार डिपॉझिटरी पार्टिसिपंट आणि डिमॅट खातेदार यांच्यातील करारावर स्वाक्ष-या झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची स्टॅम्प ड्यूटी भरावी लागणार नाही, अशी सूचना सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लि.ने (सीडीएसएल) प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकात केली आहे.