आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Notes Withdrawing Not To Connect Black Money, Rajan Cleared

नोटा चलनातून काढण्याचा काळ्या पैशाशी संबंध नाही,राजन यांचे स्पष्टीकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रिझर्व्ह बॅँकेने 2005 पूर्वीच्या नोटा चलनातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. काळ्या पैशाचा शोध घेण्यासाठी रिझर्व्ह बॅँकेने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे. परंतु रिझर्व्ह बॅँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी हा निर्णय काळा पैसा शोधून काढण्यासाठी नव्हे, तर बनावट नोटा बाजारात येण्यापासून रोखण्यासाठी घेण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
काळा पैसा किंवा करबुडवेगिरीच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आलेला नाही. याचा अर्थ या गोष्टी चांगल्या आहेत असे म्हणायचे नाही. ही तांत्रिक कारवाई आहे.
नव्या नोटांच्या तुलनेत सुरक्षिततेच्या कमी उपाययोजना असलेल्या नोटा चलनातून काढून टाकण्यात येणार असल्याचे राजन यांनी तिसर्‍या तिमाहीतील नाणेनिधी धोरण आढाव्यानंतर बोलताना स्पष्ट केले. नकली नोटांची शक्यता कमी करण्याचा यामागे प्रयत्न असून जनतेच्या हातात विश्वासार्ह नोटा देण्याचा उद्देश यामागे आहे.