Home | Business | Auto | now bike fly in air

आता मोटारसायकल देखील उडणार हवेत

बिजनेस ब्यूरो | Update - Jun 13, 2011, 12:54 PM IST

या बाईक मध्ये जेट इंजिनचा वापर करण्यात आला आहे

  • now bike fly in air

    जर तुम्हाला बाईक वेगात चालवण्याची आवड असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण आता एक नवीन बाईक तयार करण्यात आली आहे की जी फक्त वेगात धावणारी नसून हवेत उडणारी देखील आहे. ‘फिल पाऊले’ नावाच्या कंपनीने या बाईकची निर्मिती केली आहे.

    या बाईक मध्ये जेट इंजिनचा वापर करण्यात आला आहे त्यामुळे ही बाईक प्रचंड वेगात पळू शकते इतकेच नव्हे तर जमिनीपासून ती १ फूट उंच हवेत उडूही शकते. या बाईकला विमानासारखे ‘विंग्ज’ देखील लावण्यात आले आहेत. या बाईकचा वेग ताशी ३०० मैल इतका आहे.

    आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे ही बाईक चालवण्यासाठी तुम्हाला विमान चालवण्याच्या परवान्याची देखील गरज नाही. जर तुम्ही बाईक शौकीन असाल आणि तुमच्याकडे भरपूर पैसे असतील तुम्ही या बाईकचा नक्कीच विचार करू शकता.

Trending