आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करान्यूयॉर्क- केवळ थंड हवेवर कार चालवल्याचा दावा ब्रिटनमधील एका संशोधकाने केला आहे. ही कार ताशी 48 कि.मी. वेगाने धावते. पीटर डीअरमॅन या संशोधकाने 25 वर्षांपूर्वीच्या व्हॉक्सहॉल नोव्हा कारमध्ये बदल करून तिला केवळ हवेवर चालण्यायोग्य बनवले आहे. हर्टफोर्डशायरच्या बिशप स्टोर्टफोर्ड यांच्या मालकीच्या या कारची 5 कि.मी.पर्यंत चाचणी घेण्यात आली. हवा हेच इंधन असल्यामुळे कारमधून धूर बाहेर पडत नाही. वातावरणातील उष्णता व द्रवरूप हवेचा यात वापर केला आहे. डीअरमनने तयार केलेले इंजिन स्टीम इंजिनच्या तत्त्वावर आधारलेले आहे. थंड हवा स्वस्त आणि हलकी असल्यामुळे तिचा इंधन म्हणून वापर करण्यात आल्याचे डीअरमनचे म्हणणे आहे. उणे 190 अंश सेल्सियस वातावरणात हवेचे द्रवात रूपांतर होते. थंड हवा व्हॅक्यूम सील कंटेनरमध्ये बंदिस्त करता येऊ शकते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.