स्क्रीनचा रंग सांगेल / स्क्रीनचा रंग सांगेल एसएमएस चांगला की वाईट!

वृत्तसंस्‍था

Jun 19,2012 04:41:22 AM IST

लंडन- तुमच्या मोबाइलवर संदेशाच्या माध्यमातून आलेली वार्ता गुडन्यूज आहे की बॅड हे समजण्यासाठी आता तुम्हाला एसएमएस उघडून वाचण्याची गरज पडणार नाही. तर एसएमएसचा कलरच तुम्हाला सांगेल, ही वार्ता आनंदाची आहे की दु:खाची. कलर्ड एसएमएसचे जादुई तंत्रज्ञान लवकरच ग्राहकांच्या भेटीला येणार आहे.
ब्रिटनच्या पोर्ट्समाऊथ विद्यापीठातील स्कूल ऑफ कॉम्प्युटरिंगच्या संशोधकांच्या पथकाने हे संशोधन विकसित केले आहे. या टीमने संदेशांसाठी ‘कलर्स कोडिंग’चे तंत्रज्ञान शोधून काढले आहे. या तंत्रामुळे अनावश्यक, मनस्ताप देणा-या संदेशामधूनही ग्राहकांची सहजतेने सुटका होणार आहे. नको असणा-या संदेशांवर कलर्स कोडिंग संदेशांच्या माध्यमातून बॅन आणता येऊ शकेल. संशोधकांनी सांगितले की अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमद्वारे चालणा-या मोबाइलवर या नव्या कोडिंग प्रणालीचा प्रयोग करण्यात आला आहे. त्या प्रयोगाचे निष्कर्ष सप्टेंबरमध्ये स्पेन येथे होणा-या आंतरराष्‍ट्रीय इन्फर्मेशन अँड इंजिनिअरिंग सिस्टिमवर होणा-या 16 व्या आंतरराष्‍ट्रीय परिषदेत सादर केले जाणार आहेत.
मुख्य संशोधक मोहंमद गेबर यांनी सांगितले की, या संशोधनाचा उद्देश मोबाइल फोनचा वापर करणा-या ग्राहकांची निगेटिव्ह, अनावश्यक एसएमएसमधून सुटका करून त्यांना दिलासा देणे हा आहे. अशा संदेशांपासून अलिप्त राहून तणाव कमी करण्याचा ते प्रयत्न करू शकतील.

X
COMMENT