आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सामन्यांच्या स्वप्नातील घर आता वास्तवात, गृह कर्ज होणार स्वस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - चार लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या लोकांच्या स्वप्नातील घर साकार व्हावे म्हणून अर्थ मंत्रालय स्वस्त गृहकर्जाची एक योजना सुरू करणार आहे. राष्‍ट्रीय गृह बँक (एनएचबी) या योजनेसाठी 2 हजार कोटी रुपयांचा अर्बन हाउसिंग फंड (यूएचएफ) उभा करत आहे. या निधीची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली होती. तरतुदींना अंतिम रूप देण्यात आले असून अर्थ मंत्रालयाकडून घोषणा बाकी आहे.


वाणिज्यिक बँका, गृहवित्त महामंडळ, सहकारी बँका, केंद्राच्या अधिकृत वित्तीय संस्थांच्या माध्यमातून शहरी व्यक्ती सवलतीच्या व्याजदरांवर गृहकर्ज घेऊ शकतील, असे एनएचबीचे अध्यक्ष, सीएमडी आर.व्ही. वर्मा म्हणाले. एनएचबी मुख्य व्याजदरावर दोन टक्क्यांची सवलत देईल. सध्या बँकेचे व्याजदर 9.75 टक्के आहेत. योजनेअंतर्गत 7.75 टक्के व्याजाने कर्ज मिळू शकेल. कर्जावर क्रेडिट गॅरंटी ट्रस्टचे कव्हरसुद्धा मिळेल; परंतु ते पाच लाखांपर्यंत कर्जावरच
लागू असेल, असे वर्मा म्हणाले.


घ्या 16 लाखांपर्यंतचे घर
ज्यांचे वार्षिक उत्पन्न चार लाख रुपयांपर्यंत आहे त्याच लोकांना योजनेचा लाभ.


60 चौरस मीटरपर्यंत क्षेत्रफळाचे घर खरेदी करायचे असेल आणि त्याची किंमत 16 लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल तर 10 लाख रुपयांपर्यंत गृह कर्ज मिळणार.


एनएचबीला ही योजना लागू करण्यासाठी अधिकार देण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत बँका किंवा निवास वित्त महामंडळांना एनएचबीकडून रिफायनान्स करण्यात येईल.