आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Facebook चे नवे फीचर : मृत्यूनंतरही User चे अकाऊंट होत राहील अपडेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेसबूकने एक नवीन फिचर सुरू केले आहे. त्यानुसार एखाद्या यूझरच्या मृत्यूनंतरही 'लेगसी कॉन्टॅक्ट' द्वारे त्याचे पेज अपडेट होत राहील. 'लेगसी कॉन्टॅक्ट' द्वारे मृत यूझरच्या कुटुंबातील सदस्य किंवा मित्र फेसबूकला यूझरची डेथ नोटिफिकेशन मिळाल्यानंतर लॉग इन करून मृताचे यूझर पेज अपडेट करू शकतो. मृत्यूनंतर अकाऊंट पूर्णपणे डिलीट करण्याचा पर्यायही यूझरकडे उपलब्ध असेल.
काय करता येईल लेगसी कॉन्टॅक्टमध्ये :
- प्रोफाइल टाइमलाइनच्या टॉपवर पोस्ट करता येईल.
- कुटुंबातील सदस्य आणि मित्रांच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारता येतील.
- प्रोफाइल पिक्चर आणि कव्हर फोटो अपडेट करता येईल.
- यूझर लेगसी कॉन्टॅक्टला फोटो, पोस्ट आणि प्रोफाइल इन्फॉर्मेशन डाऊनलोड करण्याची परवानगी मिळू शकते.
हे करता येणार नाही...
- लेगसी कॉन्टॅक्ट मृताचे खासगी मॅसेजेस वाचू शकणार नाही तसेच मृताप्रमाणे लॉग इनही करू शकणार नाही.
- सध्या फेसबूकने अमेरिकेत ही सुविधा सुरू केली असून लवकरच इतर देशांमध्येही त्याची सुरुवात केली जाणार आहे.
असे करा अॅक्सेस?
यूझर सेटिंगच्या सिक्योरिटी सेक्शनमध्ये लेगसी कॉन्टॅक्टचा पर्याय असेल.
आतापर्यंत काय व्हायचे?
आतापर्यंत फेसबूक यूझरच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर मृताचे पेज मेमरलाइज्ड अकाऊंट मध्ये रुपांतरीत व्हायचे. हे अकाऊंट पाहाता येत होते मात्र अपडेट करणे शक्य नव्हते.