आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now If The Waiting Ticket Will Confirm Then Railway Will Send The Sms

SMS ALERT: वेटिंग तिकिट \'कन्फर्म\' होताच प्रवाशांना मिळणार एसएमएस!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- प्रतिक्षा यादीतील (वेटिंग लिस्ट) प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने आणखी एक एसएमएस सेवा सुरु केली आहे. वेटिंग तिकिट 'कन्फर्म' झाल्याचे प्रवाशांना आता एसएमएसद्वारे सुचित करण्यात येणार आहे. या सेवेमुळे प्रवाशांचा 139 डायल करण्याची अथवा 'आयअारसीटीसी'च्या (irctc) वेबसाइटवर जाऊन माहिती घेण्याची गरज नाही. ही माहिती रेल्वे राज्यमंत्री अधीर रंजन चौधरी यांनी सोमवारी दिली.

एसएमएस सेवेची चाचणी गेल्या 10 दिवसांपासून सुरु होती. रेल्वे प्रशासनाने आजपासून ही सेवा सुरु केली आहे. तिकिट कन्फर्म होताच त्याचा अलर्ट एसएमएस नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर तत्काळ पाठविला जाणार आहे.

रेल्वेची ही एसएमएस सेवा 'सीआरआयएस'द्वारा (CRIS) विकसित करण्‍यात आली आहे. विशेष म्हणजे तिकिट आरएसी (RAC) झाले तरी प्र वाशांना एसएमएसद्वारे कळविण्यात येणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले आहे.