Home | Business | Gadget | now it is possible to delete anothers mobile sms

आता दुस-याच्या मोबाईलमधील मेसेज करता येतील डिलीट

बिजनेस ब्यूरो | Update - Jun 13, 2011, 11:57 AM IST

या पर्यायामुळे आपण ठरवलेल्या वेळेस मोबाईल मधील मेसेज किंवा व्हिडिओ स्वत:हून डिलिट होईल

  • now it is possible to delete anothers mobile sms

    समजा तुम्ही एखाद्याला व्हिडिओ मेसेज केला किंवा एसएमएस केला आणि तो मेसेज किंवा एसएमएस तुमच्या मर्जीनुसार तुम्ही ज्याला पाठवला आहे त्याच्या मोबाईल वरून तुम्हाला डिलीट करता आले तर. तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे? असं कधी होईल का? पण आता हे शक्य झालं आहे. तुम्ही विश्वास ठेवा अगर ठेवू नका. ‘टायगर टेक्स्ट’ नावाचे हे नवीन मोबाईल अ‍ॅप्ल्किेशन खास यासाठीच तयार करण्यात आले आहे. या सॉफ्टवेअरचा उपयोग करून आपल्याला आपण दुस-याला पाठवलेले एसएमएस किंवा व्हिडिओ केव्हाही मिटवू शकतो.

    सॉफ्टवेअर तयार करणा-या कंपनीच्या मते यामधील ‘ऑटो डिलीट’ हा पर्याय निवडून आपण मोबाईल फोनच्या संदेश प्रणालीवर नियंत्रण मिळवू शकतो. या पर्यायामुळे आपण ठरवलेल्या वेळेस मोबाईल मधील मेसेज किंवा व्हिडिओ स्वत:हून डिलिट होईल.

    हे सॉफ्टवेअर आयफोन, अ‍ँड्रॉईड आणि ब्लॅकबेरी मोबाईल हँंडसेटवर वापरता येऊ शकते. या सॉफ्टवेअरमुळे मोबाईल ग्राहकांची चांगली सोय झाली असली तरी यामुळे देशाच्या सुरक्षिततेला धोका पोहचू शकतो असे सुरक्षा तज्ज्ञांना वाटते.

Trending