आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून स्मार्टफोन वापरण्याचा ट्रेंड लोकप्रिय झाला आहे. प्रत्येकजणांच्या हातात आता स्मार्टफोन दिसतोय. या वाढत्या बाजारपेठेचा फायदा उचलण्यासाठी अनेक कंपन्यांनी ग्राहकांसाठी वेगवेगळया योजना आणल्या आहेत. अनेक मल्टीनॅशनल कंपन्या आणि भारतीय हँडसेट उत्पादक कंपन्यांनी स्मार्टफोन बाजारपेठेत आघाडीचे स्थान घेण्यासाठी मासिक हप्त्यांवर फोन विकण्याची शक्कल लढवली आहे. अॅपल, सॅमसंगपासून मायक्रोमॅक्स आणि कार्बनसारख्या कंपन्यांनी सुलभ हप्त्यांवर (ईएमआय) स्मार्टफोन विकण्यास सुरूवात केली आहे.
इतकेच नव्हे तर ईएमआयसाठी ते वेगवेगळया स्कीम्सचेही जोरदार मार्केटींग करत आहेत. भारतीय बाजारपेठेतील वाढत्या स्मार्टफोन बाजारावर कब्जा मिळवण्यासाठी कंपन्यांनी ईएमआयचा आधार घेतला आहे.
ईएमआयची लढाई सुरू केली ती अॅपलने. कंपनीने 2013च्या सुरूवातीपासूनच आपला महागडा स्मार्टफोन हप्त्यांवर देण्याची पद्धत सुरू केली. कंपन्यांनी अनेक बँकाबरोबर यासाठी करार केला आहे. या कराराअंतर्गत विना व्याज आणि प्रोसेसिंग फी शिवाय ग्राहकांना सहा किंवा 12 हप्त्यांमध्ये स्मार्टफोन घेता येईल. अनेक कंपन्या या क्रेडीट कार्ड धारकांना या सुविधा देत आहेत.
टेलिकॉम क्षेत्रातील एका तज्ज्ञाने दिलेल्या माहितीनुसार भारतातील ग्राहक 20 हजार रूपयांपेक्षा जास्त किमंतीचा हँडसेट घ्यायची इच्छा असून एवढे पैसे एकदम गुंतवण्याची त्यांची इच्छा नसते. अशावेळी पाच ते आठ हजार रूपयांपर्यंत डाऊन पेमेंट भरून जर मासिक हप्त्यांवर हा हँडसेट खरेदी करण्याची संधी जर त्याला दिली तरी निश्चितच तो हँडसेट खरेदी करतो. या योजनेचा सर्वाधिक फायदा अॅपल कंपनीला मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. या योजनेला मिळालेल्या प्रतिसादामुळे अॅपलच्या स्मार्टफोन विक्रीत अचानक 50 टक्क्यांनी वाढ झाली. त्याचा सॅमसंगसारख्या इतर कंपन्यांवरही झालेला दिसून येतो. त्यामुळे इतर कंपन्यांनीही मासिक हप्त्यांची योजना सादर केली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.