आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now Real Time Gross Settlements Business Take 12 Hours

आरटीजीएस व्यवहारांना आता १२ तासांची वेळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ऑनलाइन इलेक्ट्रॉनिक पेमेंट्सला प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट्स म्हणजेच आरटीजीएस (पैसे खात्यावर टाकण्याची ऑनलाइन सुविधा) व्यवहारांची वेळ १२ तासांवर नेली आहे. येत्या २९ डिसेंबरपासून सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत आरटीजीएस व्यवहार करता येतील. शनिवारी त्यासाठी सकाळी ८ ते दुपारी ३.३० पर्यंतचा वेळ असेल.
याआधी आरटीजीएससाठी सकाळी ९ ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंतची वेळ होती.
आरटीजीएसद्वारे सध्या किमान दोन लाख रुपयांपासूनची रक्कम ट्रान्सफर केली जाऊ शकते. दोन लाखांपेक्षा कमी रक्कम हस्तांतरित करण्यासाठी नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर म्हणजेच एनईएफटीची सुविधा आहे.