Home | Business | Gadget | now solar mobiles comes in a market

आता सोलार मोबाइल येतोय

प्रतिनिधी | Update - Apr 07, 2012, 11:14 PM IST

मोबाइल फोनच्या चार्जिंगच्या कटकटीपासून वाचण्यासाठी मायक्रोमॅक्सच्या नव्या मोबाइल फोनमध्येच इनबिल्ट सोलार चार्जर असेल.

  • now solar mobiles comes in a market

    मुंबई- मोबाइल फोन मग तो अगदी साधा असो की स्मार्ट असो, त्याची बॅटरी किती वेळ टिकणार हा प्रश्न नेहमीच मोबाइलप्रेमींना पडतो. ब-याचदा जास्त वेळ बोलल्याने, काही अ‍ॅप्लिकेशन्स सतत चालू राहिल्याने ‘लो बॅटरी’ असा संदेश आल्यावर रागही येतो; पण आता तो येणार नाही. मायक्रोमॅक्स लवकरच बाजारात घेऊन येत असलेल्या नव्या मोबाइलला सौर ऊर्जेची साथ मिळाली आहे. त्यामुळे बॅटरीचे आयुष्य तर वाढणार आहेच; पण ती बॅटरी अवघ्या तीन तासात चार्ज होण्याचा दावाही कंपनीने केला आहे.
    मोबाइल फोनच्या चार्जिंगच्या कटकटीपासून वाचण्यासाठी मायक्रोमॅक्सच्या नव्या मोबाइल फोनमध्येच इनबिल्ट सोलार चार्जर असेल. हा मोबाइल तीन तासांत चार्ज होऊन दीडतास टॉकटाइम मिळू शकेल असे कंपनीने म्हटले आहे; परंतु या मोबाइलच्या आणखी वैशिष्ट्यांबद्दल माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. हा स्मार्टफोन नाही तर फ्युचर फोन असेल. सौर ऊर्जेच्या मदतीने बॅटरी चार्ज होणार असल्यामुळे भारनियमनाचा त्रास असलेल्या ग्रामीण भागातील ग्राहकांना या मोबाइलचा फायदा होऊ शकतो. मायक्रोमॅक्सच्या अगोदर व्होडाफोनने देखील व्होडाफोन व्हीएफ 247 हा सोलार पॅनल सुविधा असलेला फोन बाजारात आणला होता.

Trending