आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय मल्ल्यांच्या ‘युनायटेड स्पिरिट्स‘वर आता ‘दिएगो’चा ताबा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जॉनी वॉकर, स्मर्नऑफ या मद्यांच्या निर्मितीत आघाडीवर असलेल्या दिएगोने आता मद्यसम्राट विजय मल्ल्या यांच्या युनायटेड स्पिरिटसवर ताबा मिळवला आहे. ‘दिएगो’ने युनायटेड स्पिरिटमधील 25. 02 टक्के भांडवली हिस्सा 5,236 कोटी रुपयांना खरेदी केला आहे.


दिएगो या कंपनीने गेल्या वर्षी युनायटेड स्पिरिटमधील 53.4 टक्के भांडवली हिस्सा 11,166.5 कोटी रुपयांना खरेदी करण्याचे जाहीर केले होते, परंतु ठरल्याप्रमाणे हा व्यवहार न होता आता युनायटेडमधील केवळ 25.02 टक्के भांडवली हिस्सा 5,235.85 कोटी रुपयांना खरेदी करता आला आहे.


युनायटेड स्पिरिटच्या भागधारकांना 10 ते 26 एप्रिल या कालावधीत अतिरिक्त 26 टक्के भांडवली हिस्सा खरेदी करण्याची ओपन ऑफरही देण्यात आली होती, परंतु त्यास फारसा प्रतिसाद मिळाला नाही. गुरुवारी हा खरेदीकरार पूर्ण झाल्यानंतर आता युनायटेड स्पिरिटमध्ये दिएगो ही सर्वात मोठी भागधारक कंपनी असेल, असे दिएगोने म्हटले आहे. दिएगोने गुरुवारी युनायटेड स्पिरिटमधील आणखी 14.98 टक्के भांडवली हिस्सा प्रतिसमभाग 1440 रुपये याप्रमाणे 3,134.56 कोटी रुपयांना खरेदी करण्याचा व्यवहारदेखील पूर्ण केला आहे.


हा खरेदी व्यवहार पूर्ण झाल्यानंतर भारतीय मद्य उद्योगात वृद्धीच्या आणखी संधी उपलब्ध होण्यास मदत होणार. उत्पन्नात वाढ झाल्यामुळे प्रीमियम आणि प्रतिष्ठेच्या स्थानिक मद्य ब्रॅँड्सकडे मध्यमवर्गीयांचा कल वाढला असून त्यामुळे भारतीय बाजारपेठ आमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे दिएगोचे सीईओ इव्हान मेनेझेस यांनी म्हटले आहे.