आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now Your Watch Care Yours Health, Nissan Made Smart Watch

घड्याळाचे आरोग्यावर ‘वॉच’,कार उत्पादक कंपनी निसानचे स्मार्ट घड्याळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो - कार उत्पादक कंपनी निसानने नवे स्मार्ट वॉच (घड्याळ) विकसित केल्याचा दावा केला आहे. हे घड्याळ घातल्यावर कार चालवत असताना ते तुमच्या आरोग्याचीही काळजी घेईल.


पारंपरिक स्मार्ट वॉचप्रमाणेच दिसणा-या या स्मार्ट वॉचमुळे चालकाचा रक्तदाब, हृदयाचे ठोके, तापमान व शरीराशी निगडित इतर बारीकसारीक समस्यांवर लक्ष ठेवण्यास सक्षम आहे. विशेष म्हणजे हे स्मार्ट वॉच केवळ चालकाच्या प्रकृतीवरच नव्हे, तर गाडीतील इंधनाची स्थिती, त्याचा खप, गाडीचा वेग आदी बाबींवरही लक्ष ठेवणार आहे. वाहनाचा सरासरी वेग, नियंत्रणात ठेवण्यासाठी व त्याची माहिती चालकास देईल. कंपनीने सादर केलेल्या घड्याळाचे नाव निस्मो वॉच असे आहे. टेलिमेटिक्स व परफॉर्मन्स डेटावर लक्ष ठेवण्याच्या उद्देशाने हे वॉच संगणक प्रणालीला जोडता येते. निस्मोचा वापर करणारे या गॅझेटद्वारे निसानकडून संदेश प्राप्त करू शकतात. चेस हॅलेट यांनी सांगितले की, सध्या वापरात असलेल्या घड्याळांच्या तुलनेत कार कनेक्टेड स्मार्ट वॉच अधिक उपयुक्त आहेत. त्याचा ग्राहकांना पावसाळा, थंडीतही वापर करता येऊ शकतो.