आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now Youtub Video Offline, No Tension Baffaring, Charges

यूट्यूब व्हिडिओ आता ऑफलाइन; | बफरिंगची, चार्जेसची चिंता नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुबई - व्हिडिओ डाऊनलोड होताना बफरिंगची कटकट आणि ते चालू असताना लागणा-या मोबाइल डेटा चार्जची चिंता त्यामुळे व्हिडिओ बघायचा तरी कसा असे प्रत्येकाला वाटत असते; पण आता ही चिंता नाही यूट्यूबवर तुम्हाला व्हिडिओ बघण्याची मजा ऑफलाइन लुटता येणार आहे. अर्थात सर्वच नाही सध्या तरी ठरावीक व्हिडिओ अशा प्रकारे बघता येणार आहेत.
‘अँड्रॉइड वन स्मार्टफोन्स’च्या अनावरणप्रसंगी यूट्यूबने अँड्रॉइड आणि आयओएससाठी या ऑफलाइन फीचरची घोषणा केली होती. ती आता प्रत्यक्षात आल्यामुळे माेबाइलधारकांवरील डेटाचा भार कमी होणार आहे. यूट्यूब अ‍ॅपच्या या नव्या ऑफलाइन फीचरमुळे मोबाइलधारकांना वाय-फाय किंवा त्यांच्या डेटा प्लानचा वापर करून ऑफलाइन व्हिडिओ डाऊनलोड करता येतील. एकदा का हे व्हिडिओज ऑफलाइन घेतले की
ते कोणत्याही इंटरनेट कनेक्शनशिवाय ४८ तासांपर्यंत पाहता येऊ शकतील. त्यामुळे स्लो-कनेक्शनची काळजी न करता यूट्यूबवरच्या व्हिडिओजचा आनंद आता घेता येणार आहे.
भारतासारख्या देशामध्ये इंटरनेटचे भवितव्य मोबाइलच्या हाती असणार आहे. इंटरनेट वापरणारी ८५ टक्के जनता इतर कोणत्याही उपकरणांऐवजी आपल्या मोबाइलद्वारे इंटरनेटशी कनेक्ट होते. भारतातला आमच्याकडे येणा-या डेटाचा ४० टक्के ओघ हा मोबाइल उपकरणांद्वारे येतो. माेबाइलचा प्राधान्याने वापर करणा-यांना यूट्यूबवर आता नवा आनंद मिळणार आहे.
विशेषकरून ऑफलाइनच्या नव्या फीचरमुळे डेटा कनेक्शन, वेग आणि खर्च अशा सर्व अडचणींवर मात करत बफरमुक्त अनुभव घेता येईल, असे यू ट्यूबच्या अभियांत्रिकी विभागाचे उपाध्यक्ष जॉन हार्डिंग यांनी सांगितले.

यूट्यूबवरऑफलाइन व्हिडिओ कसा बघाल ? :
- यूट्यूब अपडेट नसेल तर ते अपडेट करा. आपल्याला हवा असलेला व्हिडिओ शोधा. तो शोधल्यानंतर ओपन करा. पूर्णपणे डाऊनलोड होईपर्यंत ‘बफरिंग’ होत राहील. बफरिंग पूर्ण झाल्यानंतर ‘डेटा कनेक्शन’ बंद करा आणि नंतर तो व्हिडिओ ऑफलाइनमध्ये सेव्ह होतो. हा सेव्ह केलेला व्हिडिओ ४८ तासांपर्यंत विनासायास बघता येतो.
- सर्वच व्हिडिओंसाठी ही सुविधा उपलब्ध नसेल. ज्या व्हिडिओजना हे फीचर लागू असेल, त्यांच्या व्हिडिओ फ्रेमच्या आतमध्ये ऑफलाइन आयकॉन असेल. केवळ त्या आयकॉनवर टॅप करून युजर्स ते व्हिडिओ अ‍ॅड करू शकतील.
- ऑफलाइनवर उपलब्ध असलेले कंटेंट : टी- सिरीज, सारेगामा, यशराज िफल्म
- यूट्यूबवर सध्या उपलब्ध असलेले भारतीय चित्रपट : १०,०००, भारतीय गाणी : २,५०,००० पेक्षा जास्त
- ऑफलाइन कंटेंट : विनोदी चुटक्यांपासून निवडक बॉलीवूड आणि पॉप, भांगडा गाणी.