आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनआरई योजना : 60 दिवसांत भारतात आले 26,880 कोटी रुपये

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- रुपयातील घसरणीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडून पडण्याची वेळ आली असताना परदेशात राहणाºया अनिवासी भारतीयांनी (एनआरआय) याचा चांगलाच फायदा उचलला आहे. एप्रिल-मे या दोन महिन्यांत एनआरआयनी देशात तब्बल 4.8 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 26,880 कोटी रुपये पाठवले आहे. गतवर्षातील एप्रिल-मे कालावधीपेक्षा यंदाचे प्रमाण 7 पटींनी वाढले आहे.
देशातील बँकांत असलेल्या ठेवींवर अधिक व्याज मिळवण्यासाठी अनिवासी भारतीय ‘नॉन रेसिडेंट एक्सटर्नल अकाउंट’ (एनआरई) योजनेचा भरपूर फायदा घेतला आहे. योजनेनुसार देशातील बँका विदेशी चलन ठेवींवर तगडा व्याजदर देत आहेत. मंगळवारी रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार दोन महिन्यांत देशात 4.8 अब्ज डॉलर्सचा विदेशी चलन आले आहे.
या उलट गतवर्षी याच कालावधीत एनआरआयने 133 दशलक्ष डॉलर्सच्या ठेवी काढून घेतल्या होत्या. यंदा रुपयाच्या अवमूल्यनामुळे एनआरआयची चांदी झाली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी परकीय चलन देशात येणे हे चांगले संकेत असल्याचे विश्लेषकांनी म्हटले आहे.
30 टक्के वाटा पंजाबींचा- योजनेंतर्गत भारतीय बँकांना प्राप्त झालेल्या एकूण गुंतवणुकीचा 30 टक्के वाटा पंजाबी एनआरआयचा आहे. या हिशेबाने हा आकडा सुमारे 8 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचतो.
काय आहे एनआरई खाते- विदेशी निधी जमा करण्यासाठी वापरली जाणारी बँक खाती. यात विदेशी चलन, ट्रॅव्हल्स या नोटांच्या रुपयात जमा करू शकतात.
परदेशातून येणा-या पैशांवर सेवा कर नाही - नवीन कर नियमांवर मंगळवारी केंद्र सरकारकडून सेंट्रल बोर्ड आॅफ एक्साइज अँड कस्टम्स खात्याने (सीबीईसी) स्पष्टीकरण दिले. परदेशातून पाठवलेल्या पैशांवर सेवा कर आकारण्यात येत नसल्याचे बोर्डाने स्पष्ट केले. 1 जुलैपासून परदेशातून भारतात आलेल्या पैशांवर 12 टक्के सेवा कर आकारण्यात येणार असल्याबद्दल करदांत्यात संभ्रम निर्माण झाला होता.
अधिक फायद्यासाठी गुंतवणूक वाढवली- वरिष्ठ बँक अधिका-यांनुसार, देशातील बँकांतून तगडा परतावा मिळावा म्हणून अनिवासी भारतीय फॉरेन नॉन रेसिडेंट बँक्स (एफएनआर-बी) खात्यांतून आपली रक्कम काढून ती एनआरई खात्यांत जमा करत आहेत. काही जण डॉलर्स व इतर परकीय चलनातील आपली रककम या खात्यांत वळवत आहेत.
विदेशी डिपॉझिटवर व्याजदर डिरेग्युलेट- रिझर्व्ह बँकेने डिसेंबरमध्ये एनआरआयच्या डिपॉझिटवर मिळणाºया व्याजांचे दर आपल्या नियंत्रणातून मुक्त केले आहेत.