आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निफ्टी लवकरच 8000 वर; भारतीय अर्थव्यस्थेत उभारीचे संकेत : यूबीएस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारतीय अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे संकेत आहेत. निवडक क्षेत्रांत सुधारणा दिसत असून राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक लवकरच 8000 ची पातळी गाठण्याची शक्यता असल्याचे मत यूबीएसच्या अहवालात म्हटले आहे.

जागतिक वित्तीय सेवा क्षेत्रात मानाचे स्थान असणार्‍या यूबीएसने भारतीय अर्थव्यस्थेत सुधारणा होत असल्याचे सांगत आशादायी चित्र असल्याचे अहवालात नमूद केले आहे. असे असले तरी मालवाहतुकीच्या वाहन विक्रीत अपेक्षेप्रमाणे वाढ झालेली नाही. ग्राहक क्षेत्रातही काही प्रमाणात मरगळ आहे, रखडलेल्या प्रकल्पांची संख्या मोठी आहे, त्यामुळे अल्पावधीसाठी अर्थव्यवस्थेच्या गतीला हे बाधक ठरू शकते, असा इशारा देण्यात आला आहे. यंदाच्या वर्षअखेर निफ्टी 8000 ची पातळी गाठू शकते, असे यूएसबीने म्हटले आहे. मात्र, त्यासाठी अहवालात नमूद केलेल्या बाधक बाबी मार्गी लागणे आवश्यक असल्याचे यूएसबीने स्पष्ट केले.

भारतीय औद्योगिक उत्पादनात अलीकडेच झालेली सकारात्मक वाढ, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील सुधारणा, प्रवासी वाहनांच्या विक्रीतील वाढ, सिमेंटच्या किमती तसेच ऊर्जा निर्मितीत झालेली वाढ हे सर्व अर्थव्यस्थेला गती आल्याचे संकेत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.